कोरोना, पुन्हा २४ मृत्यू, ११८९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:51+5:302021-05-07T04:13:51+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. गुरुवारी उपचारादरम्यान जिल्ह्यातील २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,०६९ वर ...

कोरोना, पुन्हा २४ मृत्यू, ११८९ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. गुरुवारी उपचारादरम्यान जिल्ह्यातील २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,०६९ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य चार रुग्णांचे मृत्यू अन्य जिल्ह्यातील आहे. तसेच १,१८९ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ७१,८८३ झालेली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ४,३०५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २७.७१ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आलेली आहे. गुरुवारच्या तुलनेत तीन टक्क्यांनी प्रमाण कमी झालेले आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झाल्याने खबरदारीच्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाद्वारा करण्यात येत आहेत. तालुका ठिकाणी कोरोना हेल्थ सेंटर तसेच पीएचसीत कोरोना सेंटर उभारण्यात येत आहे. याशिवाय होम आयसोलेटेड रुग्णांवर वॉच ठेवण्यासाठी ग्राम सुरक्षा समित्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहे. याशिवाय हॉटस्पॉट असलेल्या मोठ्या गावांमध्ये मिनी लॉकडाऊन करण्यात येत आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी ग्रामीण यंत्रणेचा आढावा घेतला यामध्ये कंटेन्मेट झोन, ग्राम समित्या याविषयीची माहिती घेवूण आवश्यक ते निर्देश यंत्रणेला दिले आहेत.
बॉक्स
गुरुवारचे मृत्यू
जिल्ह्यात उपचारादरम्यान शहरातील २७ वर्षीय महिला, अमरावती, ६० वर्षीय महिला, अचलपूर, ७० वर्षीय पुरुष, महेंद्र कॉलनी, ५५ वर्षीय पुरुष, दापोरी, मोर्शी, ६० वर्षीय पुरुष, वाशीम, ४८ वर्षीय पुरुष, मोर्शी, ७४ वर्षीय पुरुष, दर्यापूर, ३५ वर्षीय पुरुष, जामगाव खाडका, ७० वर्षीय महिला, दस्तुरनगर, ६६ वर्षीय महिला, पुसला, वरूड, ३३ वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे, ५५ वर्षीय महिला, शेंदूरजना माहुरा, ७४, पुरुष, अचलपूर, ६९ वर्षीय महिला, सेमाडोह, चिखलदरा, ५० वर्षीय पुरुष, अंजनगाव, ५० वर्षीय महिला, स्वामी विवेकानंद शाळेजवळ, ५३ वर्षीय पुरुष, राहटगाव, ३५ वर्षीय महिला, राजना, चांदुर बाजार, ४३ वर्षीय पुरुष, धारणी, ३८, महिला, धारणी याशिवाय अन्यजिल्ह्यातील ५६ वर्षीय पुरुष, वाशीम, ४४ वर्षीय पुरुष, नेर, यवतमाळ, ३८ वर्षीय पुरुष, पुलगाव, वर्धा, ६५ वर्षीय पुरुष, अकोला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.