कोरोना @ ९०, आणखी एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:37+5:30

बाधिताच्या संपर्कात आल्याने खरकाडीपुरा येथील महिलेला यापूर्वीच कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांना आता कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुरुवारी मृत ताजनगरातील व्यक्ती देखील यापूर्वी त्यांच्याच कुटंबातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधित झाली होती.

Corona @ 90, another positive | कोरोना @ ९०, आणखी एक पॉझिटिव्ह

कोरोना @ ९०, आणखी एक पॉझिटिव्ह

ठळक मुद्देसंक्रमित खासगी डॉक्टरचा मृत्यू : बुधवारचे दोन कोरोनाग्रस्त ‘सारी’चेही रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात कोरोना विषाणू चांगलाच पाय पसरवित आहे. येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगतच्या खरकाडीपुरा भागातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना ग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. ताजनगरातील एक ४४ वर्षीय पॉझिटिव्ह खासगी डॉक्टर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान दगावल्याने मृतांची संख्या १३ झालेली आहे. सद्यस्थितीत ५६ कोरोनामुक्त, तर २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बाधिताच्या संपर्कात आल्याने खरकाडीपुरा येथील महिलेला यापूर्वीच कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांना आता कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुरुवारी मृत ताजनगरातील व्यक्ती देखील यापूर्वी त्यांच्याच कुटंबातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधित झाली होती. त्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी कोरोनामुक्त करण्यात येणार होते. मात्र, त्यांचा अहवाल वेळेच्या आत न आल्याने त्यांना थांबविण्यात आले व गुरुवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेले लालखडीतील ६५ वर्षीय व्यक्ती व नांदगाव पेठ तेथील ६० वर्षीय महिला ‘सारी’चे रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. सर्दी, ताप व खोकला आदी कोरोनासदृश लक्षणे असल्याने त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला असता, ते संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयातील दुसºया माळ्यावरील कक्षात हलविले आहे. आतापर्यंत चार ‘सारी’चे रुग्ण हे कोविड-१९ चे असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यूदेखील झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान बाधिताच्या घराकडे जाणारे मार्ग यंत्रणेद्वारा बंद करण्यात आलेले आहे. या भागात निर्जंर्तकीकरणाची फवारणी करण्यात आली व आरोग्य पथकाद्वारा सर्व्हे सुरू झालेला आहे. खरकाडीपुरा प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आतापर्यंत ‘सारी’चे ६५ रुग्ण निष्पन्न
कोरोनाच्या प्रादुर्भावाने दीड महिन्याच्या कालावधीत झालेल्या आरोग्य तपासणीत ‘सारी’चे ६० ते ६५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू, तर तीन रुग्णांचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारपासून शहरासह जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा सर्व्हे सुरू झाला. यामध्ये सारी, इली, यासोबतच सर्दी, ताप, खोकला व हायरिस्कचे रुग्ण व गर्भवती स्त्रियांची माहिती घेण्यात येत आहे. यासोबतच पथकाद्वारा जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

अंबिकानगर, बेलपुरा कटेंनमेंट झोन नाही
येथील कोविड रुग्णालयातील दोन व्यक्ती बुधवारी पॉझिटिव्ह आल्यात. मात्र, या दोन्ही व्यक्ती कोविड रुग्णालयातील त्यांच्या सेवेनंतर क्वारंटाईनमध्ये होत्या. दरम्यान चार ते पाच दिवसांनंतर त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आलेले आहे. या दहा ते २१ दिवसांच्या अवधीत त्यांचा थेट संपर्क, त्यांचे वास्तव्य असणाऱ्या अंबिकानगर व बेलपुरा भागाला आलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही भाग कटेनमेंट झोन जाहीर करण्यात येणार नाही. मात्र, दक्षतेचा उपय म्हणून त्यांच्या परिवारातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

Web Title: Corona @ 90, another positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.