कोरोना : १४ दिवसांत ७८ वर बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:17+5:302021-03-16T04:14:17+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे ११ महिन्यांच्या काळात ६०० व मार्च महिन्याच्या १४ दिवसांत ७८ वर संक्रमितांचा मृत्यू झाल्याने ...

कोरोना : १४ दिवसांत ७८ वर बळी
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे ११ महिन्यांच्या काळात ६०० व मार्च महिन्याच्या १४ दिवसांत ७८ वर संक्रमितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला हादरा बसला आहे. याच काळात ४२ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी आढळला. हा रुग्ण ‘होमडेड’ होता. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ६०० चे वर कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला. १ फेब्रुवारी ते १४ मार्च या ४२ दिवसांमध्ये तब्बल २०,५१८ कोरोनाग्रस्तांची व १८१ मृत्यूची नोंद झालेली आहे.
कोरोनाने मृत्यूसंख्येत कमी येण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल स्वत: लक्ष देऊन आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात अंगावर दुखणे काढणे घातक ठरत आहे. याशिवाय २० प्रकारचे कोमर्बिड आजाराच्या रुग्णाला झालेला कोरोनाचा संसर्गदेखील एकप्रकारे गंभीर मानला जात आहे. आरोग्य विभागाद्वारा करण्यात आलेल्या ‘डेथऑडिट’मध्ये हे कारण अगदी ठळकपणे नोंदविण्यात आले आहे. याशिवाय संक्रमितांच्या मृत्यूसंख्येत ५० ते ७० या वयोगटातील अधिक रुग्ण असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
बॉक्स
मार्च महिन्यात अंत्यसंस्काराला ‘वेटींग‘
या महिन्यात १ मार्चला १०, २ ला १२ रुग्णांचे मृत्यू झाले. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा एकही दिवस निरंक नाही. १५ मार्चपर्यंत मृत्यूची संख्या ही ८० वर पोहोचली आहे. मृत्यूची संख्या वाढतीच असल्याने शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला वेटींगवर राहण्याची वेळ आलेली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेले मृत व्यक्ती व जिल्हा प्रशासनाने त्याच दिवसी जाहीर केलेले त्याच दिवसातील मृत्यूसंख्या यात तफावत असल्याची चर्चा सुरू आहे.