कोरोना; १६,००० क्रॉस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:00 AM2020-10-28T05:00:00+5:302020-10-28T05:00:14+5:30

सप्टेंबर महिन्यात दरदिवशी दीड हजारांपर्यंत नमुने तपासणीला पाठविले जात असे. आता रविवारी १०० ते १५० व इतर दिवशी ५०० पर्यंत नमुन्यांची तपासणी अमरावती येथील विविध प्रयोगशाळांमध्ये होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट येत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय चाचण्यांमध्ये आता पॉझिटिव्हिटीचे प्रमाणदेखील १४ ते १८ टक्क्यांवर आहे. हेच प्रमाण सप्टेंबर महिन्यात ३५ ते ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते, हे येथे उल्लेखनीय.

Corona; 16,000 crosses | कोरोना; १६,००० क्रॉस

कोरोना; १६,००० क्रॉस

Next
ठळक मुद्देसोमवारी ६३ : सप्टेंबरमध्ये ७८७३, ऑक्टोबरमध्ये २२८९ संक्रमित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात २०५ दिवसांत म्हणजेच २७ ऑक्टोबरला ६० रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १६,०४० वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३६१ झाला आहे.
जिल्ह्यात महापालिका क्षेत्रातील हाथीपुऱ्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत संक्रमणात सातत्याने वाढ झाली आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात संसर्गाला आळा बसला. सप्टेंबर महिन्यात तब्बल ७,८४३ म्हणजेच दररोज सरासरी २६२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. आता ऑक्टोबर महिन्याचे २७ दिवसांत २२८९ रुग्ण निष्पन्न झाले. म्हणजेच दररोज ८४.७७ संक्रमितांची नोंद झाली आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाला, हे म्हणणे इतक्यात धाडसाचे ठरेल.
सप्टेंबर महिन्यात दरदिवशी दीड हजारांपर्यंत नमुने तपासणीला पाठविले जात असे. आता रविवारी १०० ते १५० व इतर दिवशी ५०० पर्यंत नमुन्यांची तपासणी अमरावती येथील विविध प्रयोगशाळांमध्ये होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट येत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय चाचण्यांमध्ये आता पॉझिटिव्हिटीचे प्रमाणदेखील १४ ते १८ टक्क्यांवर आहे. हेच प्रमाण सप्टेंबर महिन्यात ३५ ते ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते, हे येथे उल्लेखनीय.

पुन्हा एकाचा बळी, एकूण ३६१
जिल्ह्यात उपचारादरम्यान मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमणने दगावलेल्यांची संख्या ३६१ झाली. सद्यस्थितीत मृत्यूचे प्रमाण हे २.१ टक्के असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात नमूद आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने मंगळवारी ९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यत १४, ८३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. संक्रमणमुक्तांचे प्रमाण उच्चांकी ९२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Web Title: Corona; 16,000 crosses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.