कोरोनाचे १२ मृत्यू, ६३६ संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:32+5:302021-03-04T04:21:32+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी १२ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ५३३ ...

Corona 12 deaths, 636 infected | कोरोनाचे १२ मृत्यू, ६३६ संक्रमित

कोरोनाचे १२ मृत्यू, ६३६ संक्रमित

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी १२ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ५३३ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. २,२७६ चाचण्यांमधून ६३६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ३६,४५२ झाली आहे. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २७.९४ टक्के राहिले.

कोरोना संक्रमितांची संख्या दररोज ६०० ते ९०० च्या सुमारास निघत असल्याने त्याच्या तुलनेत मृतांची टक्केवारी कमी असली तरी दररोज १० ते १२ मृत्यूने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तरीदेखील नागरिकांमध्ये कोरोनाप्रति गांभीर्य दिसत नाही, ही शोकांतिका आहे. महिनाभरात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन पथकांद्वारे जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाचा ‘क्लास’ या अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानंतरही आकडेवारीत फारसा काही बदल झाल्याचे दिसून आले नाही.

विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या दर्यापूर व कंटेनमेंट झोन असलेल्या अंजनगाव सुर्जीला भेट दिली. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व नियमांचे पालन होण्यासाठी आरोग्य, पोलीस, नगरपालिका या यंत्रणांनी सजग राहून कामे करावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. अंजनगाव सुर्जी येथील कोविड केअर सेंटर व दर्यापूर ग्रामीण रुग्णालयालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर, पारिचारिका यांच्यासह रुग्णांशीही संवाद साधला. बाधित क्षेत्रात तपासण्यांची संख्या वाढवा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. गृह विलगीकरणातील व्यक्तींकडून नियम काटेकोरपणे पाळले जातील, याकडे कटाक्ष ठेवा, असे निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स

मंगळवारचे कोरोना मृत्यू

०००००००००००

०००००००००००००००००००००

००००००००००००००००००००००

बॉक्स

होम आयसोलेशनच्या रुग्णाला २५ हजारांचा दंड (फोटो)

महापालिका क्षेत्रात ज्योती कॉलनीतील होम आयसोलेशनची सुविधा घेतलेले एक रुग्ण घराबाहेर दुचाकीने फिरताना आढळला. त्याच्या घराबाहेर बोर्डदेखील लावलेले नाही. त्यामुळे पथकाने २५ हजारांचा दंड करून २४ तासांच्या आत भरणा करण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाईची नोटीस पथकाद्वारे बजावण्यात आली. या रुग्णाची होम आयसोलेशनची सुविधा रद्द करून त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

पाॅईंटर

१ फेब्रुवारीपासून ३० दिवसांतील जिल्हा सद्यस्थिती

* कोरोनाग्रस्त :१४,४७३

* कोरोनामुक्त : ८,६३१

* मृत्यू : ११५

* चाचण्या : ५०,११७

* पॉझिटिव्हिटी : २८.५३

Web Title: Corona 12 deaths, 636 infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.