अचलपूर पोलीस ठाण्यातील शिपायाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:26 IST2021-02-21T04:26:09+5:302021-02-21T04:26:09+5:30

अचलपूर : स्थानिक पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई प्रेमराज राऊत यांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. कोषागार व तहसील ...

Corolla kills soldier at Achalpur police station | अचलपूर पोलीस ठाण्यातील शिपायाचा कोरोनाने मृत्यू

अचलपूर पोलीस ठाण्यातील शिपायाचा कोरोनाने मृत्यू

अचलपूर : स्थानिक पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई प्रेमराज राऊत यांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोषागार व तहसील कार्यालयात ड्युटीवर असलेले प्रेमराज राऊत हे दोन-तीन दिवसांपासून आजारी होते. त्यांनी आजाराबाबत घरी कुणालाही सांगितले नाही. दरम्यान, शनिवारी राहत्या घरी ते भोवळ येऊन कोसळले. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली.

प्रेमराज राऊत हे सन २०११ पासून अचलपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे. कोरोनायोद्धा म्हणून काम केलेल्या राऊत यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याची घटना आमच्यासाठी फार वेदनादायी असल्याचे अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी सांगितले.

----------------

Web Title: Corolla kills soldier at Achalpur police station