नांदगाव बाजार समितीवर सहकार पॅनेलचा झेंडा

By Admin | Updated: July 21, 2015 00:09 IST2015-07-21T00:09:50+5:302015-07-21T00:09:50+5:30

नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने बाजी मारली.

Cooperation panel flag on Nandgaon Market Committee | नांदगाव बाजार समितीवर सहकार पॅनेलचा झेंडा

नांदगाव बाजार समितीवर सहकार पॅनेलचा झेंडा

परिवर्तन पॅनेलचा सफाया : १२ जागा जिंकल्यात
नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने बाजी मारली. १८ संचालकांच्या जागांपैकी १२ जागा या पॅनेलने पटकाविल्या. त्याचे प्रतिस्पर्धी शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलला ६ जागांवर समाधान मानावे लागले.
सेवा सहकारी सोसायटीच्या अकराही जागा सहकार पॅनेलने पटकाविल्या असून यात सर्वसाधारणमध्ये प्रमोद ठाकरे, विलास चोपडे, विलास सावदे, वसंत माणके, म.जावेदभाई, गजानन मेटकर, ज्ञानेश्वर हांडे, हे उमेदवार विजयी झाले. तसेच या मतदारसंघात महिला जमाती मतदारसंघात भाष्कर तुपट आणि इतर मागासवर्गीयमधून प्रभात ढेपे हे उमेदवार विजयी झालेत. तसेच या पॅनेलचे ग्रामपंचायत सर्व साधारण मतदारसंघातून प्रशांत ठाकरे असे एकूण १२ उमेदवार विजयी झालेत.

मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून सत्तेला न जुमानता गटाशी जुळून राहिले. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आमचा विजय हा सर्वसामान्य नागरिकांचा विजय आहे.
- अभिजित ढेपे, जि.प. सदस्य.

Web Title: Cooperation panel flag on Nandgaon Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.