चांदूर बाजार समितीवर सहकार पॅनेलचे वर्चस्व
By Admin | Updated: September 17, 2015 00:02 IST2015-09-17T00:02:46+5:302015-09-17T00:02:46+5:30
सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण असणाऱ्या चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार पॅनेलने १८ पैकी १३ जागा पटकावून वर्चस्व स्थापित केले.

चांदूर बाजार समितीवर सहकार पॅनेलचे वर्चस्व
चांदूरबाजार : सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण असणाऱ्या चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार पॅनेलने १८ पैकी १३ जागा पटकावून वर्चस्व स्थापित केले. बुधवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास आटोपली. गेल्या ११ वर्षांपासून तालुक्यात सर्वच राजकीय क्षेत्रात वर्चस्व गाजविणाऱ्या ‘प्रहार’च्या यशाला या निवडणुकीत पहिल्यांदाच खीळ बसली आहे.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, राष्ट्रवादीच्या वसुधा देशमुख, शिवसेनेच्या सुरेखा ठाकरे, भाजपचे प्रमोद कोरडे, बाळासाहेब अलोणे यांचे सहकार पॅनेल व आ. बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्ष समर्थित शेतकरी पॅनेलमध्ये थेट लढत होती. मात्र, या निवडणुकीत सहकार पॅनेलचे १८ पैकी १३ उमेदवार भरघोस मताधिक्क्याने वजयी झाले तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार- शतकरी पॅनेलला केवळ पाच जागांवरच समाधान मानावे लागले.
सहकार पॅनेलला मिळालेले हे यश तालुक्याच्या राजकारणासाठी परिवर्तनाची दिशा देणारे ठरू शकते.