दीक्षांत समारंभ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गजबजले - उत्कंठा, उत्साह अन् लगबग
By Admin | Updated: February 22, 2015 00:02 IST2015-02-22T00:02:23+5:302015-02-22T00:02:23+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शनिवारी सकाळी १० वाजता एकतीसावा दिक्षांत समारंभ थाटात पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कंठा, उत्साह अन लगबग पाहायला मिळाली.

दीक्षांत समारंभ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गजबजले - उत्कंठा, उत्साह अन् लगबग
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शनिवारी सकाळी १० वाजता एकतीसावा दिक्षांत समारंभ थाटात पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कंठा, उत्साह अन लगबग पाहायला मिळाली.
शनिवारी सकाळपासूनच विद्यापीठ परिसर विद्यार्थ्यांची पदवी प्राप्त करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास एकतिसाव्या दिक्षांत समारंभाला सुरुवात होताच विद्यार्थ्यांचा उत्साह दिगुंणीत झाला. व्यासपीठावर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाचे विश्राम जामदार, कुलगूरु मोहन खेडकर, प्र-कुलगुरु जयकीरण तिडके, कुलसचिव दिनेशकुमार जोशी, परिक्षा नियंत्रण जे.डी. वडते, व्यवस्थापन परिषेदचे सदस्य व सर्व अधिष्ठाताचे आगमन होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहात दिसून आला. सर्वप्रथम सरस्वती स्तवनानंतर विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले. त्यांनतर कुलसचीवांनी कुलगुरुना पदवीकांक्षिना सादर करण्याची अनुमती माघितली. कुलगुरुनी अनुमती दिल्यावर पदवीप्रदान करण्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम पंडित व आचार्य पदवीधारकांना कुलुगरुच्या हस्ते पदवी देण्यात आली. वाड:मय विद्याशाखेचे अधिष्ठाता मोहम्मद समीउल्लाह यांनी उद्घोष करुन पंडित व आचार्य पदवीधारकांना व्यासपीठावर बोलाविले. कुलगुरुच्या हस्ते त्यांना पदवीप्रमाणपत्र देण्यात आले. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता एस.सी. रघुवंशी, आयु:शल्य विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता ए.व्ही. चांदेवार, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता पी.डब्ल्यू. काळे, शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता एम.एच.लाकडे, अभियांत्रिकी व तांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता जी.आर. बननोटे, समाजविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता बी.एम.उपाख्य संतोष ठाकरे यांनी उद््््घोषणाकरून विद्यार्थ्यांना पंडित व आचार्य पदवी घेण्याकरिता व्यासपीठावर बोलाविला. विविध विद्याशाखेतील तत्वज्ञान पारंगत, पारंगत पदविका आणि स्नातक पदवीकांक्षी पदवीप्रदान करण्यात आली. त्यानंतर ९४ सुवर्ण २२ रौप्यपदके व २४ रोख पारितोषीकांचे वितरण करण्यात आले. कुलगुरू यांनी प्रास्ताविक भाषणाला सुरुवात करुन विद्यापीठाचा इतीहास मांडून विकासात्मक दृष्टिकोन उपस्थितांना सांगितले. तसेच प्रमुख अतिथी विश्राम जामदार यांनी आपले मनोगतात विद्यार्थ्यांना भविष्यातील यश प्राप्त करण्याचे मूलमंत्र दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचे वर्चस्व असल्याने जीकडे तिकडे विविध पोषाखातील विद्याथी दिसून येत होती. दीक्षांत समारंभाच्या शेवट राष्ट्रगीता करण्यात आला. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मिरवणुकीने मंडपाबाहेर प्रस्थान केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जनसपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी अथक परिश्रम घेतले.