कंत्राटदाराकडून नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:10 IST2018-06-10T23:10:03+5:302018-06-10T23:10:03+5:30
पे-अँड पार्कच्या ठिकाणी स्वच्छता नसणे, कामगारांना ड्रेसकोड, ओळख पत्र नसणे व वाहनांचा किंवा नैसर्गिक आपत्तीचा जनरल इन्शुरन्स व कामगारांचा विमा नसणे आदी सर्व करारनाम्यातील अटींची पूर्तता झालेली नाही. वर्क ग्रुप सुशिक्षित बेरोजगार संस्थेने नियम धाब्यावर बसवून वसुली करण्यात येत असताना याकडे महापलिका आयुक्त हेमंत पवार यांचे दुर्लक्ष आहे.

कंत्राटदाराकडून नियमांची पायमल्ली
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पे-अँड पार्कच्या ठिकाणी स्वच्छता नसणे, कामगारांना ड्रेसकोड, ओळख पत्र नसणे व वाहनांचा किंवा नैसर्गिक आपत्तीचा जनरल इन्शुरन्स व कामगारांचा विमा नसणे आदी सर्व करारनाम्यातील अटींची पूर्तता झालेली नाही. वर्क ग्रुप सुशिक्षित बेरोजगार संस्थेने नियम धाब्यावर बसवून वसुली करण्यात येत असताना याकडे महापलिका आयुक्त हेमंत पवार यांचे दुर्लक्ष आहे.
शहरात पे-अँड पार्कसाठी कंत्राटदाराच्यावतीने वसुली करण्यात येत आहे. दोन हजार रूपये प्रतिदिवस १२ तास वसुलीचे महापालिकेला कंत्राटदार देत असून स्वत: २० ते २५ हजार रुपये कमावत आहेत. महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी हा प्रयोग करायाचाच होता, तर ३७ गाड्यांवर अंदाजे २० ते २५ हजार रूपये प्रतिदिवशी पैसे घ्यायला हवे होते. मात्र, निविदेत दर अल्प दाखवून हा कंत्राट दिला आहे. या ठिकाणी नागरिकांचे रोज पे-अँड पार्कची वसुली करणाऱ्या कामगारांसोबत रोज वाद होत असताना याकडे बाजार परवाना विभागाचे कायम दुर्लक्ष होत असून पथक पाठवून यासंदर्भात तपासणी करण्यात यावी व लोकांचे अभिप्राय घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.