कंत्राटदार धडकले जिल्हा कचेरीवर
By Admin | Updated: August 11, 2014 23:40 IST2014-08-11T23:40:08+5:302014-08-11T23:40:08+5:30
शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी अमरावती जिल्हा कंत्राटदार असोसिएशनने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विकास कामांचे देयके अदा न केल्यामुळे

कंत्राटदार धडकले जिल्हा कचेरीवर
अमरावती : शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी अमरावती जिल्हा कंत्राटदार असोसिएशनने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विकास कामांचे देयके अदा न केल्यामुळे तसेच अन्य मागण्यांसाठी सोमवारपासून विकास कामांवर बहिष्कार टाकत कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
कंत्राटदार असोसिएशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद व ईतर सर्व शासकीय विभागामार्फत दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या दर सूचित ठरविलेले दर मोठ्या तफावतीचे आहेत. या स्थितीत सामाईक दरसूचित सर्व बाबींचे दर हे सद्यस्थितीत प्रचलीत बाजार भावावर आधारित असावेत, राज्य शासनामार्फ त विविध निधी शिर्षाखाली कामे काढल्या जातात व ती कार्यान्वित करण्यात येतात. मात्र सहा महिन्यांपासून सर्वच शीर्षाखाली तुटपुंजी पत मर्यादा मोकळी करून कंत्राटदारांची देयके प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. एप्रिलमध्ये कामे संपल्यानंतर हा निधी उपलब्ध आहे. मात्र कंत्राटदारांना दिला नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. सर्व निधी त्वरित वितरित करून कंत्राटदारांना आर्थिक कोंडीतून मुक्त करावे, जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही शासकीय खदान वापरात नसल्याने कंत्राटदारांना खाजगी खदान मालकांच्या मर्जीवर विसंबून रहावे लागते व त्याच्या अटी व शर्तीनुसार गौण खनिज विकत घ्यावे लागते. ते त्याच्या वाहनाव्दारे वहन करून गौण खनिज पुरवावे. यासाठी राज्यस्व शुल्काची कपात बेकायदेशीर व जाचक असल्यामुळे ही पध्दत बंद करण्यात यावी व तसे आदेश संबंधित विभागाला दयावे आदी मागण्यांसाठी कंत्राटदारांनी शासकीय विकास कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात सर्व कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर धरणे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना दिलेल्या निवेदनातील मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन कंत्राटदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी संजय काळे, सचिव नरेंद्र दापूरकर, गोपाल राठी, विनोद चांडक, नितीन डहाके, नितीन भेटाळू, मोरेश्र्वर वानखडे, सुभाष भावे, बिट्टु चढा, प्रेमराज कुचे, प्रदीप चढ्ढा, आशिष आगरकर, हर्षल, रेवणे, नितीन गुळदे , राजाभाऊ ठाकरे, प्रकाश देशमुख आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)