कंत्राटी वाहनचालक निविदा कमिशन प्रकरण, महापालिकेवर युवक काँग्रेसची धङक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:49+5:302021-09-24T04:14:49+5:30
अमरावती : कमिशनसाठी स्थायी समितीने कंत्राटी वाहनचालक निविदा प्रक्रिया रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेत युवक काँग्रेस, एनएसयूआयने धडक दिली. ...

कंत्राटी वाहनचालक निविदा कमिशन प्रकरण, महापालिकेवर युवक काँग्रेसची धङक
अमरावती : कमिशनसाठी स्थायी समितीने कंत्राटी वाहनचालक निविदा प्रक्रिया रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेत युवक काँग्रेस, एनएसयूआयने धडक दिली. यावेळी भाजपचा कडाडून निषेध नोंदविण्यात आला. नीलेश गुहे, संकेत कुलट यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे.
युवक काँग्रेसच्या आरोपानुसार, वाहनचालक कंत्राटाचे कंत्राटदाराने स्थायी समितीने कमिशनमुळे कंत्राट रद्द करण्याचा जो कट केला आहे, तो अतिशय लाजीरवाणे कृत्य आहे. कमिशनकरिता एखादे कंत्राट परत पाठविणे आणि महापालिकेत कार्यरत कंत्राटी वाहनचालकांचे वेतन थांबविणे ही बाब नियमबाह्य आहे. अमरावती महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या कंत्राटदराचे प्रेस नोट काढून स्थायी समितीने कमिशन मागितले. शहरातील जनता डेंग्यू, मलेरिया, रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त असताना सत्ताधारी भाजप ही कमिशनमध्ये मस्त आहे. अमरावतीकरांसाठी यापेक्षा मोठा विश्वासघात काय होऊ शकतो, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष युवक काँग्रेस नीलेश गुहे, एन.एस.यू.आय.चे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, शहर अध्यक्ष ऋग्वेद सरोदे, युवती काँग्रेसच्या अध्यक्ष शिवाणी पारधी यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.