वारसदारांच्या लाँचिंगसाठी जोडण्या सुरू
By Admin | Updated: January 13, 2017 00:02 IST2017-01-13T00:02:35+5:302017-01-13T00:02:35+5:30
जिल्हा परिषदेचे रणांगण : अध्यक्षपद खुले असल्याने वाढली चुरस; अटीतटीच्या लढती पाहावयास मिळणार

वारसदारांच्या लाँचिंगसाठी जोडण्या सुरू
तीन वर्षांत विकास : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३५५ गावे व याअंतर्गत एक लाख ६० हजार २०७ हेक्टर खारपाणपट्ट्याच्या विकासाचे शासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याक्षेत्राच्या उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प येत्या सहा महिन्यांत सुरू केला जाईल. तो तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.
याप्रकल्पांतर्गत १५ अवर्षणग्रस्त जिल्हे व खारपाणपट्ट्याचा शाश्वत विकास करण्यात येणार आहे. मागीस १५ वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्याच्या कृषीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभे ठाकली आहेत. लहरी हवामानामुळे शेतीक्षेत्रात होणारे बदल व इतर विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी होत चालली आहे. यासाठी हा कृषी संजीवनी प्रकल्प शासनाद्वारा राबविण्यात येणार आहे. हा एकात्मिक स्वरूपाचा प्रकल्प असून समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे होणार आहे.
प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करणार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन व कृषीमूल्य साखळीचे बळकटीकरण करणे, शेती उत्पादक कंपन्यांची निर्मिती, भाडेतत्वावर कृषी अवजारे केंद्र सुविधा निर्मिती, उत्पादक कंपन्यांना शेतमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी, विक्री आदींबाबत सहाय्य करणे, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, सीडहबसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, स्थानिक परिस्थितीनुसार व पिकनिहाय कृषी हवामान सल्ला, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आदींचा समावेश राहणार आहे.
हवामान बदलामुळे शेतीवरील संभाव्य दूरगामी परिणाम
हवामानातील बदलामुळे पीक उत्पादकतेवर विशेषत: कोरडवाहू पिकांवर मोठा परिणाम होतो. अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकासाठी पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील कर्बामध्ये घट होऊन उत्पादकता कमी होते, वाढत्या तापमानामुळे जमिनीच्या ओलाव्यात घट येते.