अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरा तालुक्यांत दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:46+5:302021-04-08T04:13:46+5:30
२७ ठिकाणांहून संकलन, प्रयोगशाळेचा अहवाल, उन्हाळ्यात सांभाळा प्रकृती लोकमत विशेष नरेंद्र जावरे-परतवाडा : अचलपूर उपविभागीय प्रयोगशाळेत अचलपूर, चांदूर बाजार, ...

अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरा तालुक्यांत दूषित पाणी
२७ ठिकाणांहून संकलन, प्रयोगशाळेचा अहवाल, उन्हाळ्यात सांभाळा प्रकृती
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे-परतवाडा : अचलपूर उपविभागीय प्रयोगशाळेत अचलपूर, चांदूर बाजार, चिखलदरा या तीन तालुक्यांतील ४१० तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांपैकी २७ ठिकाणचे पाणी दूषित आढळून आले. उन्हाळा व पावसाळा लागताच मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने नदी, नाले, विहिरींसह पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी तसेच हातपंप, नळांतूनसुद्धा दूषित पाण्याचा पुरवठा होतो. ग्रामपंचायतींकडून हे पाणी नमुने वेळोवेळी गोळा करून तपासणीसाठी पाठविल्या जातात. अचलपूर येथे अचलपूर, चिखलदरा व चांदूर बाजार या तीन तालुक्यांकरिता असलेल्या प्रयोगशाळेत ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यानुसार मार्च महिन्यामध्ये अचलपूर तालुक्यातून १३९ नमुने आले होते, त्यापैकी १२ नमुने दूषित आढळून आले आहेत. चांदूरबाजार तालुक्यातून १४३ नमुन्यांपैकी नऊ पाणी नमुने दूषित आढळले. चिखलदरा तालुक्यातील १२८ नमुन्यांपैकी सहा पाणी नमुने दूषित आढळून आले. असे तीन तालुक्यांतील एकूण ४१० नमुन्यांपैकी २७ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.
तिन्ही तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांचे नमुने अचलपूर येथील उपविभागीय प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा येथे पाठवण्यात आले होते. ते तपासणीत दूषित आढळून आले.
----------
बॉक्स
येथील पाणी नमुने दूषित
अचलपूर तालुका : धोतरखेडा, जानोरी, वडनेर भुंजग, मुकिंदपूर, वासनी बु.,
असदपूर, कांडली-२, वझ्झर, मोहा फाटा, काळवीट, वाघडोह
-------------चांदूर बाजार तालुका : शिरजगाव बंड, शिरजगाव अर्डक, तळवेल-२, वडाळा, घाटलाडकी, कुरणखेड, देऊरवाडा, रेडवा
-------
चिखलदरा तालुका : कुलंगणा खु., मोझरी-२, बदनापूर, मारिता, कारंजखेडा
--------
बॉक्स
आरोग्य केंद्रांतर्गत आढळलेले दूषित नमुने
आरोग्य केंद्र तालुका तपासलेले नमुने दूषित नमुने
धामणगाव गढी अचलपूर ४५ ६
पथ्रोट अचलपूर ३९ ३
येसूर्णा अचलपूर ५५ ३
तळवेल चांदूर बाजार ३९ ५
ब्राह्मणवाडा थडी चांदूर बाजार २४ ४
टेम्ब्रुसोंडा चिखलदरा ५१ ४
हतरू चिखलदरा ६ २
कोट
अचलपूर, चांदूर बाजार व चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून प्राप्त पाणी नमुन्यांपैकी मार्च महिन्यात एकूण २७ नमुने दूषित आढळून आले आहेत.
- अंजली आवारे, अनुजैविकतज्ज्ञ, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, उपविभागीय प्रयोगशाळा, अचलपूर