डीपी रस्त्यावर दोन घरकुलांची निर्मिती

By Admin | Updated: August 6, 2015 01:30 IST2015-08-06T01:30:54+5:302015-08-06T01:30:54+5:30

विकास आराखडा (डीपी) रस्त्यावर रमाई आवास योजनेतून दोन घरकुलांची निर्मिती करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली...

Construction of two houses in DP road | डीपी रस्त्यावर दोन घरकुलांची निर्मिती

डीपी रस्त्यावर दोन घरकुलांची निर्मिती

अमरावती : विकास आराखडा (डीपी) रस्त्यावर रमाई आवास योजनेतून दोन घरकुलांची निर्मिती करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली असून यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश आयुक्त गुडेवार यांनी दिले आहेत.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या अध्यक्षस्थानी दलितवस्ती विकास योजनेच्या निधीबाबत पार पडलेल्या बैठकीत ही बाब निदर्शसनास आली आहे. स्थानिक विलासनगर येथे दलित वस्ती विकास निधी गायब होत असल्याची तक्रार दलित पँथरचे हरिदास सिरसाठ यांनी दिली होती. त्यानुसार प्रशासनाने ही बैठक घेवून मंथन केले. यावेळी राजू गवई, साहेबराव गुळसुंदरे, सहायक अभियंता भास्कर तिरपुडे, आशिष अवचारे, हबंर्डे, अशोक देशमुख, वानखडे आदी उपस्थित होते. घरकूल निर्मितीसाठी आलेल्या निधीची माहिती जाणून घेण्यात आली. शासन निर्णयानुसार घरकुलांची निर्मिती होत नसल्याचा आरोप हरिदास शिरसाठ यांनी केला. विलासनगर येथील संकुलाला मातोश्री रमाबाई आंबेडकर या नावाचे फलक लावणे, जुनी जलवाहिनी, पाण्याचा प्रश्न, सफाईचा विषय हाताळण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीवर चर्चा झाली.

Web Title: Construction of two houses in DP road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.