न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे बांधकाम नोव्हेंबरमध्ये
By Admin | Updated: July 8, 2016 00:11 IST2016-07-08T00:11:09+5:302016-07-08T00:11:09+5:30
सध्या विविध गुन्ह्यातील मृत्युच्या नेमक्या कारणांची उकल करण्यासाठी नागपूर येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पोलीस प्रशासनाला जावे लागते.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे बांधकाम नोव्हेंबरमध्ये
पालकमंत्र्यांनी केली इमारतीची पाहणी : आमदारकीच्या काळात केलेल्या प्रयत्नांची फलश्रृती
अमरावती : सध्या विविध गुन्ह्यातील मृत्युच्या नेमक्या कारणांची उकल करण्यासाठी नागपूर येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पोलीस प्रशासनाला जावे लागते. परंतु येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेचे बांधकाम नोव्हेबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर अमरावती येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतच गुन्ह्यांची उकल करता येणार आहे. पोलीस आयुक्त कार्यलयाच्या मागील बाजूस निर्माणाधीन असलेल्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या बांधकामांची किंमत ८ कोटी ८७ लाख ४२ हजार २३२ एवढी आहे. करारनाम्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी बांधकाम पूर्ण होणार आहे.
येथे भव्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे बांधकाम अंतिम टप्पयात आले आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या निमार्णाधीन बांधकामाची गुरुवारी पाहणी केली. सदर इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीली सुरूयाचे भूमिपूजन आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाले होत. परंतु निधीची तरतूद तोकडी होती. त्यासाठी आमदार असताना प्रवीण पोटे यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात विधान परिषदेत तारांकित व लक्षवेधी प्रश्नांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून भरीव तरतूद करून घेतली होती. त्या प्रयत्नांची फलश्रृती आता पहायला मिळत आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता बनगिवार यानी इमरातीची पाहणी केली.
बांधकाम गुणवत्तापूर्ण करून त्वरित कामाकाज सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधीकाऱ्यांना दिल्या आहे. (प्रतिनिधी)