‘दिल्ली दरबार’चे बांधकाम गाजले ‘डीपीसी’त
By Admin | Updated: January 9, 2016 00:31 IST2016-01-09T00:31:02+5:302016-01-09T00:31:02+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साकारण्यात आलेले हॉटेल दिल्ली दरबारचे बांधकाम कसे करण्यात आले,...

‘दिल्ली दरबार’चे बांधकाम गाजले ‘डीपीसी’त
मुंदेंनी वेधले लक्ष : महापालिका आयुक्तांना विचारला जाब
अमरावती : येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साकारण्यात आलेले हॉटेल दिल्ली दरबारचे बांधकाम कसे करण्यात आले, असा सवाल जि. प. सदस्य रवींद्र मुंदे यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. ही जागा जिल्हा परिषदेची असताना शासनाने परवानगी कशी दिली, याबाबतही शंका असल्याचे मुंदे म्हणाले. तेव्हा महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी यासंदर्भात तपासून कारवाई केली जाईल, असे आश्वासित केले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी पार पडली.
मुंदे म्हणाले,
हे का पाडत नाही ?
हल्ली शहरात गुडेवार फॅक्टर जोरात सुरू आहे. अवैध बांधकाम, अतिरिक्त इमारती पाडण्याचा सपाटा सुरू असताना 'आयुक्त गुडेवार साहेब दिल्ली दरबार हॉटेलचे बांधकाम का पाडत नाहीत', असा सवाल रवींद्र मुंदे यांनी यावेळी उपस्थित केला. या हॉटेलचे बांधकाम मंजूर नकाशा व्यतिरिक्त १४४.५० चौ.मि. जास्तीचे असल्याचे गुडेवारांच्या पत्रानुसार स्पष्ट होत, हे मान्य केले आहे. त्यामुळे हे बांधकाम पाडायला हवे.