राजापेठ येथे पुलावर सिमेंट रस्ते निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:15+5:302021-03-19T04:12:15+5:30

अमरावती : बडनेरा मार्गावरील राजापेठ येथे उड्डापुलालगत सिमेंट रस्ते निर्मितीची कामे वेगाने सुरू आहेत. बुलडोझरने खोदकाम करण्यात येत असून, ...

Construction of cement roads on the bridge at Rajapeth | राजापेठ येथे पुलावर सिमेंट रस्ते निर्मिती

राजापेठ येथे पुलावर सिमेंट रस्ते निर्मिती

अमरावती : बडनेरा मार्गावरील राजापेठ येथे उड्डापुलालगत सिमेंट रस्ते निर्मितीची कामे वेगाने सुरू आहेत. बुलडोझरने खोदकाम करण्यात येत असून, वाहतूक विस्कळीत होत आहे. एकाच मार्गाने वाहतूक सुरू आहे.

-------------------

उत्तमसरा रस्त्याची चाळण

अमरावती : बडनेरा ते उत्तमसरा या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. जड वाहनांच्या वर्दळीने हा मार्ग नादुरूस्त झाला आहे. या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्यालगत नागरीवस्ती असून, अपघाताची शक्यता बळावली आहे.

----------------

बेलपुरा मार्गावरील रस्त्यावर खड्डे

अमरावती : येथील रेल्वे स्थानक चौक ते बेलपुरा मार्गावरील रस्ता जागोजागी रस्ता उखडला आहे. हा मार्ग सतत वाहतुकीचा असताना खड्ड्याची दुरूस्ती करण्यात येत नाही. लाकेप्रतिनिधींचे या मार्गाकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

---------------------------

कारागृह वसाहत परिसरात कचरा समस्या

अमरावती : चांदूर रेल्वे मार्गालगतच्या कारागृह वसाहत हद्दित कचरा समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमधून रहिवासी कचरा याच भागात आणून टाकत असल्यामुळे कचरा समस्या वाढतच आहे. रस्त्यालगत जागोजागी कचरा ही गंभीर बाब ठरत आहे.

-----------------------

कारागृहाट्या सागवान वृक्षांची चोरी (फोटो घेणे)

अमरावती : राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यालगत सागवान वृक्षांची चोरी होत आहे. लाखोंची मालमत्ता असताना ती चोरट्यांसाठी मोकळी ठेवण्यात आली आहे, ना सुरक्षा, ना देखभाल अशी सागवान वृक्षांची स्थिती असून, हळूहळू सागवान वृक्षांची कत्तल केली जात आहे.

Web Title: Construction of cement roads on the bridge at Rajapeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.