जिल्हा स्त्रीरुग्णालयात होणार २०० खाटांच्या इमारतीचे बांधकाम
By Admin | Updated: November 5, 2016 00:12 IST2016-11-05T00:12:53+5:302016-11-05T00:12:53+5:30
येथील जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी (डफरीन) २०० खाटांची इमारत मंजूर आहे.

जिल्हा स्त्रीरुग्णालयात होणार २०० खाटांच्या इमारतीचे बांधकाम
निविदा मंजुरीसाठी शासनाकडे : ४५ कोटींच्या निधीतून होणार काम
अमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी (डफरीन) २०० खाटांची इमारत मंजूर आहे. ४५ कोटींच्या निविदेच्या मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
अंबानगरीत डफरीन रुग्णालयात हजारो रुग्णांचा जिल्ह्यातून राबता असतो. येथे विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाही करण्यात येतात. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे २०० खाटांच्या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यावर ४५.६१ कोटींचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ३० कोटींच्यावरच्या ई निविदांसाठी शासन गठित समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येते. त्यामुळे या निविदांना मंजुरी मिळाल्यानंतर ई- टेंडरींग करण्यात येईल व लवकरच या इमारतीची बांधकाम सुरू करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता साळवे यांनी सांगितले. या सुसज्य इमारतींमुळे शेकडो रुग्णांना येथे दाखल करता येणार आहे. यापूर्वी डफरीनला २०० खाटांची व्यवस्था होती. ही इमारत झाल्यानंतर ४०० खाटांची व्यवस्था होणार आहे. याचा हजारो रुग्णांना लाभ होणार आहे. (प्रतिनिधी)
डफरीनच्या ईमारतींकरिता ४५ कोटी रुपये मंजूर आहेत. ई-निविदाच्या प्रक्रियेला मंजुरी मिळण्यासाठी शासनाच्या समितीकडे पाठविले आहे.
- विवेक साळवे,
अधीक्षक अभियंता,
सा. बां. विभाग