बडनेरा मतदारसंंघाच्या विकासासाठी कटिबध्द
By Admin | Updated: October 8, 2014 22:58 IST2014-10-08T22:58:49+5:302014-10-08T22:58:49+5:30
मागील दहा वर्षांपासून बडनेरा मतदारसंघाचा विकास खुंटला असून मतदारसंघात पोस्टरबाजी, खोट्या आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघाला सुसंस्कृत व पूर्ण

बडनेरा मतदारसंंघाच्या विकासासाठी कटिबध्द
अमरावती : मागील दहा वर्षांपासून बडनेरा मतदारसंघाचा विकास खुंटला असून मतदारसंघात पोस्टरबाजी, खोट्या आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघाला सुसंस्कृत व पूर्ण विकसित मतदारसंघ घडविण्याचा विडा उचलल्याचे प्रतिपादन बडनेरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय बंड यांनी केले.
७ आॅक्टोबर रोजी किरणनगर परिसरात आयोजित पदयात्रेत मतदारांसोबत संपर्क साधताना बंड यांनी हे आश्वासन दिले. या पदयात्रेला परिसरातील महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. किरणनगर, मोतीनगर, यशोदानगर, किशोरनगर, प्रसाद कॉलनी, दत्त विहार, नरसम्मा महाविद्यालय परिसर, दस्तुरनगर चौक, प्रशांतनगर, विमलनगर, पूजा कॉलनी, फरशी स्टॉप, कंवरनगर या भागातून ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भारत चौधरी, भारत जवंजाळ, संजय पळसोदकर, राजू कावडे, बबलू खडसे, मंगेश देशमुख, बबलू गाडे, स्वप्नील साव, मनीष पाटील, गोवर्धन कानतोडे, छोटू पाटील, विकास शेळके, राहुल माटोडे, प्रवीण वाकेकर, विजय सांगोले, चेतन रुमाले, गजानन सांगोले, सुनील राऊत, संजय कराळे, रामा वाळके, सतीश ठाकूर, भवानी चव्हाण, सुनील वानखडे, संदीप नगराळे, छोटू वानखडे, गोलू चौधरी, दीपक साखरकर, साहेबराव पाटील यांच्यासह बहुसंख्य नागरिकांचा सहभाग होता.
संजय बंड यांनी आपल्या प्रचारार्थ पदयात्रा, कॉर्नर सभा आणि मतदारांच्या प्रत्येक्ष भेटीवरच भर दिला आहे. दरदिवसाला ते मतदारसंघ पिंजून काढत असून नागरिकांचा भक्कम प्रतिसाद त्यांना मिळत आहे.