'शिवाजी'च्या घटनेमध्ये दुरुस्ती होणे आवश्यक
By Admin | Updated: July 29, 2015 00:15 IST2015-07-29T00:15:32+5:302015-07-29T00:15:32+5:30
भाऊसाहेबांच्या हयातीनंतर केवळ दोनवेळा श्री शिवाजी शिक्षण संस्थेत सदस्य संख्या वाढविण्यात आली.

'शिवाजी'च्या घटनेमध्ये दुरुस्ती होणे आवश्यक
अमरावती : भाऊसाहेबांच्या हयातीनंतर केवळ दोनवेळा श्री शिवाजी शिक्षण संस्थेत सदस्य संख्या वाढविण्यात आली. संस्थेत सद्यस्थितीत १२०० सदस्य आहेत. त्यांची वर्गवारी व वयवारी पाहता हे सदस्य ६५ वर्षांच्यावर आहे. त्यामुळे संस्थेची सदस्यसंख्या वाढविणे व घटनेत दुरुस्ती होणे आवश्यक असल्याची माहिती विधीज्ञ प्रदीप महल्ले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
शिवाजी शिक्षण संस्थेच्या ८ पदाधिकाऱ्यांची निवड ही सहधर्मदाय आयुक्त यांनी निर्णयाव्दारे अवैध ठरविली. याविषयीची माहिती देण्यासाठी श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी माहिती दिली.
भाऊसाहेबांनी संस्थेत सहा राजे महाराजांना सदस्य केले. यामध्ये ग्वालीयरचे शिंदे, शाहू महाराज, हैद्राबादचे निजाम आदी सर्व 'पॅटरनिल' मेंबर आहेत.
घटनेच्या तरतुुदीनुसार या मेंबरचे छायाचित्र संस्थेच्या कार्यालयात लावणे आवश्यक असताना आजवर लावण्यात आले नाही. हा घटनेचा अवमान नाही का, असा सवाल महल्ले यांनी केला. संस्थेच्या सदस्यांची सात प्रकारांत वर्गवारी आहे. यामध्ये पॅटरनिल मेंबर, सिंपथायजर, डोनर, व्हाईस डोनर व सामान्य अशी वर्गवारी आहे.
यापैकी चारवर्गवारीमधील सदस्यांना प्रॉक्झी मताचा वापर करता येतो. मात्र, याविषयीची माहितीच कधी बाहेर येत नसल्याचे महल्ले यांनी सांगितले.