प्रस्थापितांच्या गडाला हादरा
By Admin | Updated: October 6, 2016 00:22 IST2016-10-06T00:22:48+5:302016-10-06T00:22:48+5:30
जिल्हा परिषद व ११ पंचायत समितींचा कार्यकाळ मार्च २०१७ मध्ये संपुष्टात येत असल्याने ...

प्रस्थापितांच्या गडाला हादरा
९७ पं.स. गणांचे आरक्षण जाहीर : काळ्या फिती लावून तहसीलदारांनी काढली सोडत
अमरावती : जिल्हा परिषद व ११ पंचायत समितींचा कार्यकाळ मार्च २०१७ मध्ये संपुष्टात येत असल्याने सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची लगबग सुुरु आहे. त्या अनुषंगाने बुधवारी ११ तहसील कार्यालयांत ९८ गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनेक दिग्गजांचे गण आरक्षित झाल्याने त्यांना सुरक्षित मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे. अनेकांना आरक्षणामुळे संधी चालून आली. या आरक्षण सोडतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे राजकारण वेग घेणार आहे. जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव व चांदूर रेल्वे पंचायत समिती वगळता उर्वरित ११ पंचायत समितींमध्ये तहसीलदारांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन असताना आयोगाला सहकार्य करण्यासाठी या संघटनेद्वारा काळ्या फिती लावून सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चांदूर बाजार : आरक्षण सोडतीमध्ये शिरजगाव कसबा, देऊरवाडा, शिरजगाव बंड, थुगाव पिंप्री हे गण सर्वसाधारण महिला, आसेगांव नामाप्र, बेलोरा, तळवेल येथे नामाप्र महिला, ब्राह्मणवाडा थडी अनु जाती, कुऱ्हा अनु.जाती व करजगांव येथे अनु.जमाती महिला आरक्षण निघाले. उपजिल्हाधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात सालोड, लोणी व फुबगांव गण सर्वसाधारण, धानोरा फशी सर्वसाधारण स्त्री, जनुना नामाप्र स्त्री, धानोरा गुरव अनु.जाती स्त्री मंगरुळ चव्हाळा अनु.जाती, वाढोणा रामनाथ सर्वसाधारण स्त्री, असे आरक्षण जाहीर करण्यात आले.यावेळी एसडीओ विशाल मेश्राम, तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ उपस्थित होते.
चिखलदरा : तालुक्यातील हातरु, खटकाली व टेंभ्रुसोडा गणात अनु.जमाती, चुर्णी, सलोना व तेलखार येथे अनु.जमाती स्त्री, काटकुंभ येथे अनु. जाती स्त्री व चिखली गण सर्वसाधारण आहे.
अचलपूर : तालुक्यातील धामणगाव गढी, वडगाव येथे नामाप्र स्त्री, गौरखेडा अनु.जाती,कांडली अनु.जमाती स्त्री, पथ्रोट अनु.जाती स्त्री, असदपूर नामाप्र, कविठा बु. परसापूर, शिंदी बुुु. येथे सर्वसाधारण व रासेगाव येथे सर्वसाधारण स्त्री आरक्षण जाहीर करण्यात आले.
धारणी: तालुक्यात मोगर्दा नामाप्र, कुटंगा, गोंडवाली, राणीगाव, शिरपूर व हरिसाल येथे अनु.जमाती, दिया,टिटवा, दुनी येथे अनु.जमाती तसेच सावलीखेडा येथे सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण आहे.
दर्यापूर : तालुक्यात वडनेर गंगाई येथे अनु.जाती, येवदा अनु. जमाती स्त्री, लेहगाव सर्वसाधारण स्त्री, खल्लार नामाप्र,शिंगणापूर व गायवाडी येथे सर्वसाधारण, पिंपळोद अनु.जाती स्त्री, तसेच रामतीर्थ येथे नामाप्र स्त्री असे आरक्षण निघाले. उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते, तहसीलदार राहुल तायडे आदींच्या उपस्थितीत सोडत पार पडली.
भातकुली : तालुक्यात खोलापूर येथे अनु.जाती स्त्री, साऊर सर्वसाधारण स्त्री, खारतळेगांव सर्वसाधारण, वाठोडा (शुक्लेश्वर) नामाप्र, आसरा अनु.जाती व निंभा येथे नामाप्र स्त्री राखीव आरक्षण निघाले. एसडीओ आर.ओ. लथाड, तहसीलदार वैशाली पाथरे व नायब तहसीलदार काळीवकर, कांडलकर, होले व राशेकर यांच्या उपस्थितीत सोडत करण्यात आली.
अंजनगांव सुर्जी: तालुक्यात खानमपूर पांढरी येथे सर्वसाधारण, कापुसतळणी सर्वसाधारण स्त्री, निमखेड बाजार अनु.जाती स्त्री, भंडारज नामाप्र स्त्री, सातेगाव नामाप्र व कोकर्डा गणात अनु. जाती आरक्षण निघाले आहे.
मोर्शी : तालुक्यात हिवरखेड येथे अनु.जाती महिला, खानापूर नामाप्र येरला, अनु. जमाती, नेरपिंगळाई नामाप्र स्त्री, राजूरवाडी अनु.जाती, शिरखेड नामाप्र स्त्री, अंबाडा खेड सर्वसाधारण, रिद्धपूर सर्वसाधारण स्त्री व अडगाव येथे सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण जाहीर करण्यात आले. एसडीओ कडू, तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
वरुड : तालुक्यात पुसला व मांगरुळी गणात सर्वसाधारण, सातनूर सर्वसाधारण स्त्री, बेनोडा नामाप्र स्त्री, टेंभुरसोडा अनु.जाती स्त्री, लोणी अनु.जाती, जरुड नामाप्र स्त्री, राजुरा बाजार अनु.जमाती, आमनेर नामाप्र, वाठोडा अनु. जमाती स्त्री, आरक्षण निघाले आहे. एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार आशिष बिजवल आदींच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
अमरावती : तालुक्यात शिराळा गणात अनु.जाती स्त्री, यावली सर्वसाधारण, माहुली जहांगिर नामाप्र, नांदगांवपेठ सर्वसाधारण, पुसदा अनु.जाती, कठोरा सर्वसाधारण स्त्री, वलगांव नामाप्र स्त्री, रेवसा अनु. जमाती, मासोद नामाप्र स्त्री व अंजनगांव बारी येथे सर्वसाधारण स्त्री आरक्षण निघाले आहे. एसडीओ इब्राहिम चौधरी, तहसीलदार सुरेश बगळे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.