लासूर येथील शिवमंदिराचे होईल संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:12 IST2021-04-08T04:12:46+5:302021-04-08T04:12:46+5:30

लासूर येथील पुरातन शिव मंदिर परिसरातील नागोबा मंदिर ते आनंदेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचे लोकार्पण ना. ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात ...

Conservation of Shiva Temple at Lasur | लासूर येथील शिवमंदिराचे होईल संवर्धन

लासूर येथील शिवमंदिराचे होईल संवर्धन

लासूर येथील पुरातन शिव मंदिर परिसरातील नागोबा मंदिर ते आनंदेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचे लोकार्पण ना. ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी केली व या पुरातन मंदिराचा इतिहास, बांधकामाची वैशिष्ट्ये, त्याचे बारकावे आदी माहिती तज्ज्ञांकडून घेतली. पौराणिक महत्ता लाभलेल्या लासूर येथील शिवमंदिराचे जतन, देखभाल आणि विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. मंदिराचे प्राचीन रूप व पावित्र्य जपले जावे, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन व्हावे, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सरपंच रंजना जाधव, उपसरपंच विजयमाला आठवले, सुरेखा ठाकरे, खरेदी-विक्री संघाचे गजानन जाधव, सुधाकरराव भारसाकळे, अनिल भारसाकळे, प्रदीप देशमुख, उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तज्ज्ञ अनिरुद्ध पाटील, मोहन पवित्रकार, अभियंता संदीप देशमुख, सुनील गावंडे, अमोल जाधव, नितीन पवित्रकार, ईश्वर बुंदेले, संजय देशमुख, अभिजित देवके, दीक्षांत पाटील, शिवाजीराव देशमुख, शिवाजी देशमुख, विजय मेंढे, भारती गावंडे, संतोष आठवले, दिवाकर आठवले, संजय राऊत, भाऊराव आठवले, गोपाळ देशमुख, शरद ठाकरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Conservation of Shiva Temple at Lasur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.