शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

काँग्रेसचा जनआक्रोश मेळावा : फडणवीस नव्हे ‘फसणवीस’ सरकार - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 19:48 IST

रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.

अमरावती : रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. काँग्रेसच्या अमरावती विभागीय जनआक्रोश मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक या नात्याने त्यांनी उपस्थितांमध्ये जान फुंकली. येथील सायन्स कोअर मैदानावर आयोजित या जनआक्रोश मेळाव्याला कार्यकर्ते, शेतकरी आणि सामान्य जनांची भरगच्च उपस्थिती लाभली होती. पाच ते सहा तास हा जनसमुदाय काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्यासाठी निर्धारपूर्वक बसला होता. श्रीमंतांच्या मर्सिडिज या आलीशान वाहनासाठी सहा टक्के दराने जीएसटी आकारणारे हे सरकार शेतकºयांच्या ट्रॅक्टरवर २८ टक्के जीएसटी आकारते. विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस आघाडी शासनावर खुनाचे गुन्हे नोंदविण्याची मागणी करायचे. आता फडणवीसांच्या राज्यात शेतकºयांच्या १२ हजार आत्महत्या झाल्या आहेत; फडणवीसांविरुद्ध ३०२ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली नि टाळ्यांच्या प्रतिसादाने श्रोत्यांनी ती उचलून धरली.आमच्या मनात जे आहे, तेच तुमच्याही मनात आहे. शेतकरी, नोकरदार, व्यापारी, महिला सर्वच पिचले गेले आहेत. या सरकारविरुद्ध आता लढा बुलंद करायलाच हवा. तुम्ही आमच्या पाठीवर प्रेमाने फक्त हात ठेवा, लाठ्या-काठ्या खायला आम्हीच समोर राहू, अशी सक्षम नेतृत्वाची ग्वाही त्यांनी यावेळी काँग्रेसच्यावतीने दिली. ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीला वर्ष पूर्ण होत असल्याने काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘बघता काय, खाली उतरा’ या नाºयांनी परिसर दणाणून सोडणारे मोर्चे नागपुरात विधिमंडळावर धडकायलाच हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंचावरून आ. वीरेंद्र जगताप यांनी अपेक्षापूर्तीचे आश्वासनही दिले.  माजी मंत्री वसंत पुरके, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. यशोमती ठाकूर, आ. नसीम खान, महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांचीही यावेळी प्रभावी भाषणे झाली. मंचावर विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, संजय खोडके, केवलराम काळे, किशोर बोरकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. अमित झनक, आ. राहुल बोंद्रे, आ. नसीम खान, दिलीप सरनाईक, वजाहत मिर्झा, हिदायत पटेल, अनंत घारड, सुधाकर गणगणे, नरेशचंद्र ठाकरे, अजहर हुसेन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बबलू देशमुख, संचालन आ. जगताप आणि आभार प्रदर्शन नितीन गोंडाणे यांनी केले.क्षणात कर्जमाफी - पृथ्वीराज चव्हाणआमचे सरकार असताना आम्ही शेतक-यांना क्षणात कर्जमाफी दिली. हात पसरायला लावून शेतकºयांचा अपमान केला नाही. जीएसटीची कल्पना काँग्रेसची होती. काँग्रेस सत्तेत असताना मोदींनी विरोध केला. ते सत्तेत आल्यावर जगातील अनेक देशांमध्ये असा कर असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि काँग्रेसचा योग्य तयारीचा सल्ला धुडकावून घिसाडघाईने जीएसटी लागू केला. त्यामुळे मनमोहनसिंग यांनी भाकित केल्याप्रमाणे दोन टक्क््यांनी विकासदर घसरला, अशा शब्दांत मोदी सरकारचे अपयश पृथ्वीराज चव्हाण यांनी उघड केले. ये नोट मोदी की नही थी - मोहन प्रकाश झा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जुनी नोट दाखवत मोदी म्हणाले होते, ‘आज रात १२ बजे से यह नोट कागज का टुकडा बन जाएगी.’ अविचारी निर्णयाने क्षणात कागदात रूपांतरित केलेल्या त्या नोटा नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या नव्हत्या. त्या होत्या शेतकºयांच्या, कष्टकºयांच्या, असा शाब्दिक वार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश झा यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या नीतीवर केली. हे सरकार ‘शहा-हुकूमशहां’चे आहे, असा उच्चार करताच श्रोत्यांनी दाद दिली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण