फसव्या कर्जमाफी विरोधात काँग्रेसचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:13 IST2017-07-19T00:13:04+5:302017-07-19T00:13:04+5:30
राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे.

फसव्या कर्जमाफी विरोधात काँग्रेसचा लढा
बैठकीत निर्धार : संपूर्ण सातबारा कोराच हवा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या या फसव्या कर्जमाफीसाठी आता जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने तीव्र लढा उभारण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.
कर्जमाफीसाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज करून घेतले जाणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्ष निवडणूक निरीक्षक सतिंदर पाल सिंह गिल, पक्ष निरीक्षक बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, आ. वीरेंद्र जगताप, यशवंत शेरेकर, नरेंशचंद्र ठाकरे, केवलराम काळे, विद्या देडू, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने निवडणूकीत अनेक आश्वासने नागरिक व शेतकऱ्यांना दिलीत. मात्र केवळ घोषणा बाजी करून सर्वसामान्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजप सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. याशिवाय बैठकीत काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबीवरही विस्तुत चर्चा करण्यात आली. बैठकीला सुधाकर भारसाकळे, रावसाहेब लंगोटे, बंडू देशमुख, प्रकाश काळबांडे,किशोर बोरकर, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, प्रमोद दाळू, राजू कुरेशी, अभिजित देवके, बापुराव गायकवाड, वासंती मंगरोळे व पदाधिकारी उपस्थित होते.