अर्णव गोस्वामींच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:13 IST2021-01-23T04:13:20+5:302021-01-23T04:13:20+5:30
आंदोलन : कठोर कारवाईची मागणी अमरावती : रिपब्लिकन वाहिनीचे अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ...

अर्णव गोस्वामींच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर
आंदोलन : कठोर कारवाईची मागणी
अमरावती : रिपब्लिकन वाहिनीचे अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हा कचेरीवर शेकडो कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी गोस्वामी विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
अर्णव गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाॅट्स ॲप चाटमध्ये अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच माहिती होती, असे संभाषणातून समोर आले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय व संवेदशील असलेली ही माहिती गोस्वामीकडे आलीच कशी, असा सवाल करीत शहर कॉग्रेसने केला असूनअर्णव गोस्वामी विरोधात कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहर कॉंग्रेसने निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी आमदार सुलभा खोडके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रदीप हिवसे, वंदना कंगाले, नीलिमा काळे, मंजुश्री महल्ले, शोभा शिंदे, नीरज मिश्रा, अतुल काळबांडे, मनीष पावडे, राजेश ठाकरे, सागर देशमुख, नीलेश गुहे, राजा बांगडे, समीर जवंजाळ, योगेश बुंदेले, सलीम बेग, प्रशांत डवरे, राजू भेले, मोहमद निजाम, सलीम मिरावाले आदीसह सहभागी होते.