शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

काँग्रेसची पुन्हा मुसंडी, सहा जागी सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:04 PM

नव्या वर्षांत मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : भाजपाचा चार, राष्ट्रवादी काँग्रेस दोन तर शिवसेनेचा एका सरपंचपदावर दावा

आॅनलाईन लोकमतअमरावती : नव्या वर्षांत मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली. पाच जागांवर काँग्रेसचे सरपंच निवडून आले. मोर्शी तालुक्यातील मनीमपूर ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सरपंच यापूर्वीच अविरोध निवडून आले आहेत. भाजपने चार जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन तर शिवसेनेने एका जागेवर विजयाचा दावा केला आहे.मंगळवारी मतदान पार पडल्यावर बुधवारी निकाल जाहीर झाले. यात अचलपूर, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, मोर्शी व धारणी तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोणत्याही पक्षाने अधिकृत माहिती जाहीर केली नसली तरी भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या तालुक्यांमध्येच भाजपपक्षाची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. मनीमपूर ग्रामपंचायत अविरोध असल्याने निकालाची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी करतील.मोर्शी तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या रिद्धपूरच्या सरपंचपदी काँग्रेसचे गोपाल नामदेवराव जामठे ४९८ मते मिळवून विजयी झाले. ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या चुरसीच्या लढतीत विजय जनार्दन टेकाडे यांना २८१ मते मिळवित चक्रधर अंबादास दिवे यांच्यावर अवघ्या १५ मतांना विजय मिळविला. दिवे यांना २६६ मते प्राप्त झाली. गोराळा येथे सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत मीना शंकरसिंह सोळंके यांनी १९२ मते मिळवित विजय संपादन केला. अचलपूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. यात निमदरी येथे सरपंचपदासाठी काँग्रेस समर्थित उमेदवार अलका रामदास सावलकर यांनी ३१७ मतांसह विजय मिळविला. देवगावमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार रेखा गजानन येवले यांनी ५४० मते घेत विजय मिळविला. पिंपळखुटा येथे लता गोपाल चावडेर यांनी २७३ मतासह विजयी झाल्या, तर काठोरा येथे आशिष नारायण काळे यांनी ३३४ मते घेत विजय मिळविला. भाजपने उर्वरित तीन जागांवर दावा केला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हयापूर येथे राजू भारसाकळे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार जया पंजाब गवई यांचा विजय झाला. त्यांना ३०४ मते मिळाली. जवळा येथे अविनाश पदार व रमेश मातकर गटाच्या उमेदवार रेखा भीमराव इंगोले यांनी सरपंचपदी विजय मिळविला. चांदूर रेल्वे तालुक्यात पाथरगाव येथे अंकुश बाबाराव इरपाते यांनी ५२४ मते घेत विजय संपादन केला. येथे काँग्रेसचे पाच सदस्य निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. इरपाते काँग्रेस समर्थित उमेदवार होते. कारलाच्या सरपंच म्हणून गिरासे पॅनलच्या दीपाली जाधव यांनी विजय मिळविला. येथे भाजपने गिरासे पॅनलसोबत आघाडी केली होती. या पॅनलचे सहा सदस्य निवडून आले. काँग्रेस समर्थित उमेदवाराला एका जागेवर समाधान मानावे लागले. महिला पोलिंग पार्टीमुळे चर्चेत आलेल्या धारणी तालुक्यातील भोंडीलावा येथे सरपंचपद तसेच एका सदस्यपदासाठी निवडणूक झाली. यात गोविंद बज्जा कासदेकर यांनी १०९ मते मिळवित विजय संपादन केला. वॉर्ड क्रमांक १ साठी झालेल्या सदस्यपदाच्या निवडणुकीत १२६ मते घेत बालाजी मनू मोरेराना यांनी विजय मिळविला. येथे चार सदस्य अविरोध झाले, तर दोन जागा रिक्त राहिल्या.