काँग्रेसचे थाली आंदोलन

By Admin | Updated: June 21, 2016 00:11 IST2016-06-21T00:11:03+5:302016-06-21T00:11:03+5:30

वाढती महागाई, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना कर्जमाफी नाही.

Congress plate movement | काँग्रेसचे थाली आंदोलन

काँग्रेसचे थाली आंदोलन

राजकमल चौक : महिला काँग्रेसकडून दोन तास निषेध
अमरावती : वाढती महागाई, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना कर्जमाफी नाही. मोदी सरकारने 'अच्छे दिन आयेंगे'च्या घोषणा करून लोकांची फसवणूक केली. काळा पैसा वापस आला नाही. या सर्व बाबींविरोधात महिला काँग्रेसच्यावतीने येथील राजकमल चौकात सोमवारी थाली दाखवा आंदोलन झेडण्यात आले. यावेळी जिल्हा महिला काँग्रेस व शहर काँग्रेसच्यावतीने महागाईविरुद्ध निषेध करण्यात आला.
महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर नाही. तूर डाळीचे भाव गगनाला भिडले आहे. विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत. या बाबींचा निषेध करण्याकरिता दिल्लीत व राज्यातील सर्व जिल्ह्यात रविवार व सोमवार या दोन दिवसांत आंदोलन छेडणयात आले. अमरावतीतील आंदोलनात जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, शहर अध्यक्षा अर्चना सवई, प्रदेश सरचिटणीस कांचनमाला पाटील गावंडे, माजी जिल्हा प्रदेशाध्यक्ष उषा उताणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करुन सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मीनल देशमुख, सुषमा मालवीय, नलिनी दंडाळे, जयश्री वानखडे, अख्त मिर्झा, योगिता गिरासे नाझीमा, भूमिका आकोटकर, प्राजली जगताप, सुनीता इंगोले यांच्यासह असंख्य महिला काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Congress plate movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.