भाजपा सरकारचा शहर काँग्रेसने केला निषेध
By Admin | Updated: August 26, 2015 00:07 IST2015-08-26T00:07:10+5:302015-08-26T00:07:10+5:30
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरोधात सोमवारी शहर काँग्रेस कमेटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध केला आहे.

भाजपा सरकारचा शहर काँग्रेसने केला निषेध
लक्षवेधी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अमरावती : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरोधात सोमवारी शहर काँग्रेस कमेटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध केला आहे.
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने सत्तेत आल्यापासून जनहित विरोधी भूमिका घेत अच्छे दिन येणारची गर्जना करून सर्वांवर बुरे दिन आणले आहे. याशिवाय भारताचा फरार आरोपी ललित मोदी याला मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे तर व्यापमं घोटाळाप्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांचे ३ आॅगस्ट रोजी पाच दिवसांसाठी निलंबन करण्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला आहे. केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने लोकशाही, संवैधानिक संस्था व इतर महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये हुकुमशाही कारभार करीत असल्याचे शहर काँग्रेसने म्हटले आहे. भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा सरकारचा शहर काँग्रेसने सोमवारी येथे निषेध केला आहे.
यापुढे भाजप सरकारही हुकूमशाही कदापि सहन करणार नसल्याचे काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी मागदर्शनादरम्यान ठणकावून सांगितले. यावेळी भाजपा सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करून विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, शहरध्यक्ष संजय अकर्ते, संजय खोडके, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर बोरकर, बबलु शेखावत, विलास इंगोले, अर्चना सवाई, अनिल बोके, वंदना कंगाले, विया सिसोदे, नूतन भुजाडे, राजेश चव्हाण, विनोद जगताप, अभिनंदन पेंढारी, आनंद भांबोरे, सुगनचंद गुप्ता, संजय मापले, प्रशांत महल्ले यांची उपस्थिती होती.