काँग्रेस माझा श्वास!

By Admin | Updated: October 12, 2014 23:29 IST2014-10-12T23:29:10+5:302014-10-12T23:29:10+5:30

माजी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव पेठ येथे रविवारी पार पडलेल्या प्रचार सभेत आ. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस माझा श्वास असून मी मरेपर्यंत तो कायम राहील,

Congress my breath! | काँग्रेस माझा श्वास!

काँग्रेस माझा श्वास!

प्रचार सभा : यशोमती ठाकूर यांचे पंजाला मतदान करण्याचे भावनिक आवाहन
अमरावती : माजी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव पेठ येथे रविवारी पार पडलेल्या प्रचार सभेत आ. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस माझा श्वास असून मी मरेपर्यंत तो कायम राहील, काँग्रेसलाच मते द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. अनेक संकटे उभी असली तरीही विकासकामांच्या भरवशावर जनतेपुढे जात असून आपण जिंकणारच! असा दावा त्यांनी केला.
प्रचार सभेला महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष शोभा ओझा, कमल व्यवहारे, माजी आ. भय्यासाहेब ठाकूर, सुखदेव पानसे, चरणदास इंगोले, हरिशंकर अग्रवाल, विभा देशमुख, मो.साबीर, नारायण यावले, श्रद्धा बेलसरे, भय्या पवार, स्वप्निल कोकाटे, विनोद डांगे आदी उपस्थित होते. हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, तिवसा मतदारसंघात चौफेर विकास केला. मात्र काही राजकीय विरोधक केवळ अपप्रचार करीत आहेत. काहींनी तर रात्रीतून पक्ष बदलला, कोणता झेंडा हाती घेतला हेसुद्धा त्यांना कळले नाही. मात्र; मी जन्माला आले तेव्हापासूनच काँग्रेस संस्कृतीचे बाळकडू प्राशन केले. वडिलांचे बोट धरुन राजकारण, समाजकारणाला सुरुवात केली. अनेक संकटे आली तरी काँग्रेसला सोडले नाही. काँग्रेसने ओळख दिली, नाव दिले, राजकारणात मोठे केले. त्यामुळे माझा श्वास हा काँग्रेस असून मरेपर्यंत या पक्षाला सोडणार नाही, असे म्हणत यशोमती भावनिक झाल्या. माझ्या विरोधात भांडवलदार एकवटले, कितीही आव्हाने आली तरी विकास कामांच्या भरोवशावर ही निवडणूक मी जिंकणारच, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Congress my breath!