जिल्हा कचेरीवर काँग्रेसचे आंदोलन
By Admin | Updated: December 20, 2015 00:12 IST2015-12-20T00:12:41+5:302015-12-20T00:12:41+5:30
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता ...

जिल्हा कचेरीवर काँग्रेसचे आंदोलन
अमरावती : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जा आहे. त्यामुळे भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
जीवनावश्यक वस्तुंचेही भाव गगनाला भिडले आहे. मात्र महागाई कमी होत नसल्यामुळे जनहीत व शेतकरी अडचणीत आले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस पक्ष व काँग्रेस विचारधारेला नाहक बदनाम करून जनतेला सुशासन देण्याऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोप करीत आहे. याशिवाय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना भाजपाकडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कृतीचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश महासचिव संजय खोडके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार नरेशचंद ठाकरे, केवलराम काळे, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, हरिभाऊ मोहोड, सरिता मकेश्वर, अरूणा गोरले, सदस्य महेंद्र गहेरवाल, अभय वंजारी, बापुराव गायकवाड, मोहन सिंघवी, गणेश आरेकर, प्रवीण घुईखेडकर, उमेश केने, श्रीराम नेहर, प्रल्हाद ठाकरे, विद्याताई देदू, वासंतीताई मंगरोळे, विलास पवार, प्रमोद दाळू, मनोज जयस्वाल, राजू कुरेशी, भागवत खांडे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, बिट्टू मंगरोळे, बच्चू बोबडे, सागर देशमुख, संजय लायदे, दयाराम काळे, सतिश धोंडे, सुरेश आडे आदी उपस्थित होते.