गोस्वामीवर कारवाईसाठी शुक्रवारी काँग्रेसतर्फे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:12+5:302021-02-05T05:26:12+5:30

पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके आदी मान्यवर आंदोलनाचे ...

Congress to hold action against Goswami on Friday | गोस्वामीवर कारवाईसाठी शुक्रवारी काँग्रेसतर्फे धरणे

गोस्वामीवर कारवाईसाठी शुक्रवारी काँग्रेसतर्फे धरणे

पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके आदी मान्यवर आंदोलनाचे नेतृत्व करतील.

...........

मुक्त विद्यालयातून प्रवेश, नाव नोंदणीसाठी मुदतवाढ

अमरावती : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळात इयत्ता पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थ्यांना ३१ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.

...........................................................

झेडपी प्रजाकसत्तादिनासाठी सज्ज

अमरावती : जिल्हा परिषदेत सोमवारी प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून सामान्य प्रशासन विभागाने ध्वजारोहणाकरिता आवश्यक तयारी केली आहे. याकरिता परिसर स्वच्छतेसह इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

..............................

चाैसाळा ते चिचोंना रस्ता उखडला

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चौसाळा ते चिचोंना गावाकडे जाणारा रस्ता उखडला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

..................................

झेडपीतील उद्यानाचा होणार कायापालट

अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या आवारातील उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. याकरिता प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले असून, त्यासाठीची आवश्यक कामेसुध्दा सुरू केली आहेत.

Web Title: Congress to hold action against Goswami on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.