वीज वितरण कंपनीवर काँग्रेसची धडक
By Admin | Updated: June 28, 2016 00:07 IST2016-06-28T00:07:37+5:302016-06-28T00:07:37+5:30
वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या अघोषित लोडशेडिंग व इतर समस्यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे.

वीज वितरण कंपनीवर काँग्रेसची धडक
अघोषित भारनियमनाचा उद्रेक : आश्वासनानंतर धरणे स्थगित
धामणगाव रेल्वे : वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या अघोषित लोडशेडिंग व इतर समस्यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. शहर काँग्रेस कमेटी व तालुका कॉँग्रेस कमेटीच्या नेतृत्वात महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर १०० से १५० नागरिकांचा जमाव धडकला. तब्बल तीन तासांनंतर अमरावती जिल्हास्तरीय कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन स्थगित केले गेले.
धामणगाव रेल्वे शहरात विज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार प्रचंड वाढला असून शहरात अघोषित लोडशेडिंग दैनंदिन झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विनाकारण रात्रीच्या वेळी विजय पुरवठा खंडीत केला जाऊन नागरिकांना वेठीस धरल्या जात आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली जात नसून नागरिकांना वेठीस धरीत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. तक्रारी निवारणासाठी व वीज वितरण कंपनीचा निषेध करण्यासाठी शहर कॉँग्रेस कमेटी व तालुका कॉँग्रेस कमेटीच्या संयुक्त विद्यमाने वीज कार्यालयावर तालुकाध्यक्ष मोहन सिंगवी, श्रीकांत गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उइके, जि.प. सदस्य मोहन घुसळीकर, शहराध्यक्ष वसंत देशमुख, सचिदानंद काळे, नवीन कनोजिया, नितीन कनोजिया आदींच्या नेतृत्वात वीज कार्यालयावर सकाळी ११ वाजता धडक देण्यात आली. यावेळी सहायक अभियंता आत्राम यांना जाब विचारला. आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.