शिरखेड ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:12 IST2021-01-22T04:12:48+5:302021-01-22T04:12:48+5:30
फोटो पी २१ शिरखेड मोर्शी : तालुक्यातील शिरखेड येथील ग्रामपंचायतीवर सचिन ठोके यांच्या नेतृत्वात पॅनेल निवडून आले. विजयी उमेदवारांमध्ये ...

शिरखेड ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व
फोटो पी २१ शिरखेड
मोर्शी : तालुक्यातील शिरखेड येथील ग्रामपंचायतीवर सचिन ठोके यांच्या नेतृत्वात पॅनेल निवडून आले. विजयी उमेदवारांमध्ये सचिन ठोके, राजेंद्र पारवे, रवि झाकर्डे, शकिलाबानो सौदागर व ललिता गावंडे तर माजी आमदार साहेबराव तट्टे यांच्या पॅनेलचे नितीन जाणे, दीपाली दापुरकर, संध्या देशमुख, मीना मोहोड, काँग्रेसप्रणित किशोर कांडलकर गटाचे किशोर कांडलकर व उज्ज्वला देशमुख हे ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याने शिरखेड ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसने सात जागा, तर साहेबराव तट्टेप्रणित पॅनेलने केवळ चार जागा जिंकल्या.
----------------------------
फोटो पी २१ चेनुष्टा
चेनुष्ठा येथे ग्रामविकास पॅनलचा विजय
कु-हा : तिवसा तालुक्यातील चेनुष्ठा ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद सभापती पुजा आमले यांच्या ग्रामविकास पॅनेलचे सातही उमेदवार निवडून आले. अन्य पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. विजयी उमेदवारांमध्ये प्रतीक मेहरे, जयश्री आमले, अनिता आमले, अतुल आमले, कल्पना ढोणे, विनोद ढोणे, संघमि विश्वनाथ भगत यांचा समावेश आहे.
--------------