काँग्रेसने वाढविली खोडकेंची ताकद

By Admin | Updated: September 9, 2014 23:07 IST2014-09-09T23:07:36+5:302014-09-09T23:07:36+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्कासित प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याठी सर्व पक्षीय नेते एकवटले असताना खोडके यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत आपल्या राजकीय

Congress creates the power of khadekanke | काँग्रेसने वाढविली खोडकेंची ताकद

काँग्रेसने वाढविली खोडकेंची ताकद

गणेश वासनिक - अमरावती
राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्कासित प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याठी सर्व पक्षीय नेते एकवटले असताना खोडके यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत आपल्या राजकीय मत्सद्दीपणाची चुणुक दाखविली आहे. काँग्रेस पक्षाशी हात मिळवणी करुन त्यांनी आपल्या गटातील सदस्याच्या गळ्यात महापौर पदाची माळ पाडून घेतली व राजकीय ताकद वाढविल्याचे पुन्हा सिद्ध केले.
लोकसभा निवडणूक आटोपताच खोडके यांचे राजकीय अस्तित्व लोप पावणार, असे चित्र निर्माण झाले होते. महापालिकेत राष्ट्रवादी फ्रंटच्या २३ सदस्यांपैकी ७ सदस्यांनी खोडके यांचे नेतृत्व अमान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यात सात सदस्यांचे नेतृत्व बडनेऱ्याचे आमदार हे करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेते पदाचा वाद उफाळून आला. अविनाश मार्डीकर की सुनील काळे यापैकी गटनेता कोण, हा वाद विभागीय आयुक्त, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संजय खोडके यांच्या गटातील अविनाश मार्डीकर यांची गटनेतेपदी नियुक्ती कायम ठेवली. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुनील काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगनादेश दिला.

Web Title: Congress creates the power of khadekanke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.