राकाँ, सेना, भाजप, भाकप कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश
By Admin | Updated: December 22, 2016 00:32 IST2016-12-22T00:32:12+5:302016-12-22T00:32:12+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्शी तालुक्यातील भाकपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय मोहोकार ...

राकाँ, सेना, भाजप, भाकप कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश
पक्षाला बळकटी : यशोमती, भय्यासाहेबांचे नेतृत्व
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्शी तालुक्यातील भाकपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय मोहोकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज अवचार यांच्यासह तालुक्यातील शेकडो भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते भय्यासाहेब ठाकूर व आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने आता पक्षाची स्थिती अधिक भक्कम झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आली आहे. काँग्रेस पक्षात इतर सर्व पक्षातील गणमान्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतल्याने काँग्रेसची स्थिती आता अधिकच मजबूत झाली आहे. बुधवारी आ. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आ. यशोमतींसह तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसप्रवेशानंतर एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी एकदिलाने काम करणार असल्याची ग्वाही प्रवेशकर्त्यांनी दिली.
काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये गजानन शार, राजेश पोहनकर, माजी सरपंच हरिभाऊ कावडे, नीलेश लाडवीकर, राजू धोंडे, संजय बुरंगे, नारायण टेकाम, ज्ञानेश्वर पांडे, शिवसेनेचे पवन राऊत, गजानन राऊत, सुनील गोबाडे, गजानन राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन गावंडे, मुस्तफा भाई, नईम खान, माकपचे अरूण कमोजे, दिलीप खंबले, अफसर खाँ पठाण, नीलेश बेहरे आदींचा समावेश आहे.
काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोेरणांवर विश्वास ठेऊन पक्षात आलेल्या लोकांचे स्वागत आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. इतर पक्षांमधून काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल आणि येणाऱ्यांचा विश्वासही सार्थ ठरेल.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा