नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेसतर्फे श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:04 IST2017-11-08T23:04:12+5:302017-11-08T23:04:30+5:30
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले.

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेसतर्फे श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. या निर्णयामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. जिल्हा काँग्रेस कमिटीने हा काळा दिवस पाळला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मेणबत्ती पेटवून निषेध केला.
नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेसह व्यापाºयांना याचा नाहक फटका बसला. दरम्यान ११४ लोकांचा रांगेत पैसे काढताना मृत्यूदेखील झाला. आर्थिक घडी कमालीची विस्कटली. त्यामुळे मोदी सरकारचा हा निर्णय जनहिताचा नसून तो अन्याय करणार ठरल्याचेही देशमुख म्हणाले. सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. विदेशातील काळा पैसा परत न आणता सर्वसामान्यांच्या खिशातील कष्टाचाच पैसा मोदी सरकारने जमा करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी प्रकाशराव काळबांडे, भैयासाहेब मेटकर, हेमंत येवले, प्रल्हाद ठाकरे, संजय वानखडे, सतीश धोंडे, समाधान दहातोंडे, प्रदीप देशमुख, भागवत खांडे, सुभाष पाथरे, बापुराव गायकवाड, बाबाराव कडू, यशवंत मंगरोळे, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, विशाल भट्टड, शेखर दाभणे, दिलीप तायडे, गौरव पवार उपस्थित होते.
भाजपचे धोरण जनहित विरोधी - बबलू देशमुख
सत्तेत असलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. उलट जनहित विरोधी धोरण राबवून शेतकरी व सामान्यांना वेठीस धरण्याचेच काम केले. यात शेतकरी कर्जमाफी, वाढती महागाई, जीएसटी, असे बरेच निर्णयाने अच्छे दिनऐवजी बुरे दिन आणल्याचे बबलू देशमुख म्हणाले.