विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसप्रवेश
By Admin | Updated: December 23, 2016 00:10 IST2016-12-23T00:10:35+5:302016-12-23T00:10:35+5:30
नजीकच्या सुलतानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत

विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसप्रवेश
काँग्रेसचे बळ वाढले : वीरेंद्र जगताप यांचे नेतृत्व
नांदगाव खंडेश्वर : नजीकच्या सुलतानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी गावातील प्रमुख रस्त्यावर लावण्यात आलेल्या काँग्रेस कमिटीच्या फलकाचे अनावरण देखील करण्यात आले.
गावांत बुधवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव मोहोकार होते. तर नांदगावचे नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, मोखडचे सरपंच सुनील शिरभाते, अशोक शिरभाते, हरिभाऊ हाडके, राजेश तिडके, रामभाऊ जळीत, रूपराव शिरभाते, अतुल ठाकूर, सरफराज खाँ, अमोल धवसे, गजानन मारोटकर, माजी सरपंच नलिनी गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ग्राम काँग्रेस कमिटी, सेवादल, युवक व महिला काँग्रेस कमिटी स्थापन करण्यात आली.
प्रास्ताविक देवेंद्र सव्वालाखे व आभार प्रदर्शन राजू राजुरकर यांनी केले. याप्रसंगी पांडुरंग हाडके,संतोष हाडके, विनोद मोहोकार, गोविंद शिंगाडे, कैलास गिरी, शंकर परतिके, राजेश हाडके, पवन गेडाम, संतोष गुल्हाने, जीवन सव्वालेखे, विनय मोहोकार, शुभम् मोहोकार, दिलीप इंगोले, रणजित मेश्राम, अमोल हाडके, हर्षल टाके, इंद्रकला नारनवरे, निर्मला तुरणकर आदींची उपस्थिती होती. या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळाली आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान पक्षाला लाभ पोहोचेल. (तालुका प्रतिनिधी)