शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

विद्यापीठाच्या पुरवणी अर्थसंकल्पात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 5:00 AM

पीजी डिप्लोमा कोर्सदेखील पुरवणी अर्थसंकल्पात दुरुस्ती करताना शब्दांची फेरफार केली आहे. परफाॅर्मिंग आर्टसाठी झालेल्या खर्चाचे स्पष्टीकरण विचित्र असल्याचे ते म्हणाले. मायक्रोबॉलॉजीसाठी वाढीव खर्च दोन लाखांवरून चार लाख दाखविण्यात आला. साहित्याची ने-आण व अन्य प्रकारचा खर्च यात दर्शविला आहे. परफॉर्मिंग आर्टसाठीदेखील १ लाख ८१ हजार खर्च  पाच लाखांवर वाढविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वाढीव खर्चासाठी दुसऱ्यांदा सादर करण्यात  आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात घोडचुका आढळल्याने  गुरुवारी विद्यापीठाच्या विशेष अधिसभेत चांगलेच घमासान झाले. नुटाचे प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी, विवेक देशमुख यांनी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागावर  ताशेरे ओढले. पुरवणी अर्थसंकल्प चुकीसह मान्य करण्याचा पायंडा पाडणार, असे त्यांनी ठणकावून सांगितल्यामुळे पीठासीन अध्यक्षांपुढे पेच निर्माण झाला होता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत १० नोव्हेंबर रोजी पुरवणी अर्थसंकल्प पत्रासाठी अधिसभा बोलाविण्यात आली होती. परंतु, या अधिसभेत अनेक चुका पुढे आल्याने विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागास १५ दिवसांची चूक सुधारण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर  गुरुवारी विद्यापीठाची विशेष अधिसभा बोलाविण्यात आली. सभेच्या सुरुवातीला प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर दुपारच्या सत्रात पुरवणी अर्थसंकल्पावर चर्चा झाली. यावेळी नुटाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सुधारित पुरवणी अर्थसंकल्पातही मोठ्या चुका असल्याचे सांगितले. मूळ अर्थसंकल्पात शून्य खर्च दर्शविण्यात आला होता. परंतु पुरवणीमध्ये ५ लाख २५ हजार दर्शविण्यात आला आहे. किरकोळ खर्चाचे दरदेखील प्रचंड वाढले. किरकोळ खर्चात नॅक समितीच्या दौऱ्यातील खर्च घुसविण्यात आला. प्रत्यक्षात नॅकसाठी वेगळ्या निधीची तरतूद असताना असे का घडले, असा प्रश्न त्यांनी केला.पीजी डिप्लोमा कोर्सदेखील पुरवणी अर्थसंकल्पात दुरुस्ती करताना शब्दांची फेरफार केली आहे. परफाॅर्मिंग आर्टसाठी झालेल्या खर्चाचे स्पष्टीकरण विचित्र असल्याचे ते म्हणाले. मायक्रोबॉलॉजीसाठी वाढीव खर्च दोन लाखांवरून चार लाख दाखविण्यात आला. साहित्याची ने-आण व अन्य प्रकारचा खर्च यात दर्शविला आहे. परफॉर्मिंग आर्टसाठीदेखील १ लाख ८१ हजार खर्च  पाच लाखांवर वाढविण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा शैक्षणिक विभागासाठी १५ लाखांची तरतूद असताना राज्य शासनाकडून निधी मिळणार असल्याचे गृहीत धरून वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात शासनाने निधीच मंजूर केला नसताना विद्यापीठाने हा निधी कसा मंजूर केला, असा प्रश्न त्यांनी केला.चर्चेमध्ये प्रा.विवेक देशमुख, उत्पल टोंगो, ॲड. अतुल भारद्वाज, प्रदीप देशपांडे, डॉ.बी.आर.वाघमारे, नितीन खर्चे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, अर्थसंकल्प मंजूर करावा, अशी विनंती पीठासीन सभापती प्रभारी कुलगुरू डॉ. एफ.सी. रघुवंशी यांनी केली. परंतु, चुकीचा असल्याने तो मान्य तरी कसा करायचा, असा प्रश्न  सदस्यांनी केला. 

२२ टक्क्यांची मर्यादा ओलांडली पुरवणी अर्थसंकल्प पत्रात पुस्ती करताना केवळ २२ टक्के वाढीव खर्च करता येत असल्याचे प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले. परंतु, यात २२ टक्क्यापेक्षा अधिक वाढीव खर्च करण्यात आला आहे. हा खर्च कसा करण्यात आला, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन होणार असल्याचेही ते म्हणाले. 

परफॉर्मिंग ऑर्टमध्ये गोंधळपुरवणी अर्थसंकल्प पत्रिकेत परफॉर्मिंग आर्ट या विभागांतर्गत मोठा घोळ निदर्शनास आला. यात कंत्राटी कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, मल्टिटास्किंग स्टॉफ, शैक्षणिक उपक्रम अंतर्गत प्रचंड वाढीव खर्च दाखविण्यात आला आहे. हा खर्च वाढविताना वित्त व लेखा विभागाने समान स्पष्टीकरण दिल्याचे प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले.

४५ लाखांचे वातानुकूलित यंत्र विद्यापीठाच्या पुरवणी अर्थसंकल्प पत्रात २२ वातानुकुलित यंत्र खरेदीसाठी ४५ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. ही तरतूद पुढच्या अर्थसंकल्पात करता आली असती, असे सिनेट सदस्य डॉ. बी.आर. वाघमारे यांनी सांगितले. यामुळे तातडीने ही तरतूद पुरवणीत का केली, असा सवाल त्यांनी केला.

 

टॅग्स :universityविद्यापीठ