शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जाविषयी संभ्रम
By Admin | Updated: January 4, 2015 23:02 IST2015-01-04T23:02:17+5:302015-01-04T23:02:17+5:30
परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जाचा भरणा करण्याची घोषणा शासनाने केली. परवानाधारक सावकारांकडून शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या एकाही शेतकऱ्याची नोंद जिल्हा

शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जाविषयी संभ्रम
गजानन मोहोड -अमरावती
परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जाचा भरणा करण्याची घोषणा शासनाने केली. परवानाधारक सावकारांकडून शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या एकाही शेतकऱ्याची नोंद जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे नाही. जिल्ह्यातील ४३० परवानाधारक सावकारांनी चालू आर्थिक वर्षात ९० हजार ४५४ शेतकऱ्यांना १३३ कोटी ४३ लाख ४६ हजारांच्या कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.
खरीप हंगामात पेरणीपासून दीड महिना पावसाची दडी, निकृष्ट बियाणे, दुबार पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव, पावसातील खंड यामुळे सरासरी उत्पन्नात ६० ते ८० टक्क्यांनी घट आली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सोयाबीनचे अर्धेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख २० हजार ५६४ शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँका राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांकडून ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजारांचे कर्ज घेतले आहे. हे सर्व शेतकरी थकबाकीदार असल्याने बँका या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देवू शकत नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर सावकारी कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कित्येकांनी सावकारी कर्ज घेतले आहे.