कोरोना पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या ग्रेस गुण सवलतीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:49+5:302021-01-08T04:36:49+5:30

नववी, अकरावीमध्ये खेळलेल्या खेळाडूंना गुणदानाची मागणी मोर्शी : यंदा दहावी व बारावची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंना नववी व अकरावीतील ...

Confusion about players' grace points discount on corona background | कोरोना पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या ग्रेस गुण सवलतीबाबत संभ्रम

कोरोना पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या ग्रेस गुण सवलतीबाबत संभ्रम

नववी, अकरावीमध्ये खेळलेल्या खेळाडूंना गुणदानाची मागणी

मोर्शी : यंदा दहावी व बारावची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंना नववी व अकरावीतील क्रीडा स्पर्धांतील कामगिरीच्या आधारे ग्रेस गुण देण्याची मागणी जिल्हा शारीरिक व क्रीडा विषय समितीने केली आहे. याबाबत ---- यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये गेल्या मार्चपासून बंद आहेत. त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी खेळाडूंना बसला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा परिषद यांच्यावतीने दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींच्या शालेय क्रीडा स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येत असतात. यामध्ये विजेता, उपविजेता व तृतीय क्रमांक प्राप्त खेळाडूंना अनुक्रमे २५, १५ व १२ ग्रेस गुण, तर सहभागी खेळाडूंना अनुक्रमे १०, ७ व ५ गुणांची ग्रेस गुण सवलत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दिली जाते. या सत्रात कोरोनामुळे कोणत्याच प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नाहीत. शासनानेही अद्याप ग्रेस गुणांबाबत भूमिका स्पष्ट न केल्याने विद्यार्थी खेळाडू ग्रेस गुण सवलतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी मागील सत्रात नववी व अकरावीमध्ये शालेय व क्रीडा संघटनांद्वारे आयोजित स्पर्धांमध्ये कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्याची मागणी जिल्हा शारीरिक व क्रीडा विषय समितीच्यावतीने करण्यात आली असल्याचे समितीचे उपाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Confusion about players' grace points discount on corona background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.