दहावी, बारावीच्या परीक्षेत श्रेणी विषयाबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST2021-02-13T04:13:57+5:302021-02-13T04:13:57+5:30

मोर्शी : कोरोना काळात महाराष्ट्र राज्यात शिक्षण ऑनलाइन सुरू राहिले. मात्र, यामध्ये शारीरिक शिक्षण, कार्यानुभव व इतर सर्व ग्रेड ...

Confusion about grade subject in 10th, 12th exams | दहावी, बारावीच्या परीक्षेत श्रेणी विषयाबाबत संभ्रम

दहावी, बारावीच्या परीक्षेत श्रेणी विषयाबाबत संभ्रम

मोर्शी : कोरोना काळात महाराष्ट्र राज्यात शिक्षण ऑनलाइन सुरू राहिले. मात्र, यामध्ये शारीरिक शिक्षण, कार्यानुभव व इतर सर्व ग्रेड विषय मागे पडले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने शारीरिक शिक्षणाचे ज्ञान मिळाले. पण मैदानावर प्रात्यक्षिक करता आले नाही. त्यामुळे सर्वच ग्रेड विषयांची बोर्डाची परीक्षा कशी घ्यावी, असा प्रश्न शारीरिक शिक्षण शिक्षकांना पडला आहे. याबाबत शासनाने व महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी शारीरिक शिक्षकांनी केली आहे.

आता इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा होईल. त्यासाठी शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, स्काऊट, गाईड, समाजसेवा, एमसीसीसह इतर सर्व श्रेणी विषय म्हणून महत्त्वाचे मानले जातात. शारीरिक शिक्षणाचे उपक्रम घेण्यास शिक्षण विभाग, शालेय प्रशासन व शाळा व्यवस्थापन परवानगी देत नाही, अशा अनेक अडचणी शारीरिक विशेष शिक्षकांसमोर आहेत. तसेच शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रम कपातीबाबत मंडळाने कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. तसेच दहावी, बारावीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले नाही. बोर्डाच्या परीक्षेबाबत मंडळाकडून मार्गदर्शक सूचना येणे आवश्यक असल्याचे मत शारीरिक शिक्षण शिक्षक श्रीकांत देशमुख यांनी मांडले. याबाबत मंडळाने लवकरात लवकर मार्गदर्शन करावे. नेहमीप्रमाणे कदाचित यंदा शक्य होणार नसेल तर त्या कशा घ्याव्यात, याबाबत मंडळाने शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करावे, असे शारीरिक शिक्षण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप खडके, सचिव नितीन चव्हाळे, संदीप इंगोले, संदेश गिरी, सुधीर सवाई यांनी म्हटले आहे.

Web Title: Confusion about grade subject in 10th, 12th exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.