जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायत निवडणुकांविषयी संभ्रम
By Admin | Updated: March 31, 2015 00:23 IST2015-03-31T00:23:58+5:302015-03-31T00:23:58+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या २७ मार्च रोजीच्या सुधारीत आदेशानुसार जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतच्या

जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायत निवडणुकांविषयी संभ्रम
अधिसूचनाच नाही : १४ तहसीलदारांवर निलंबन कारवाईचे आयोगाचे आदेश
अमरावती: राज्य निवडणूक आयोगाच्या २७ मार्च रोजीच्या सुधारीत आदेशानुसार जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारला १४ तालुक्यात अधिसूचना प्रसिध्द झाली नाही. त्यामूळे मंगळवार ३१ मार्चपासून नामांकन अर्ज देणे व स्वीकारणे ही प्रक्रिया प्रभावित झाली आहे.
आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व तहसीलदारांना कर्तव्य पार पाडीत नसल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रधान सचिव व विभागीय आयुक्तांना दिले आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश मूळ निवडणूक कार्यक्रमातील परिच्छेद ९ नुसार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
तहसीलदार कर्तव्य पार पाडीत नसल्याने २ आॅगस्टच्या २००६ परिपत्रकानुसार तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई तत्काळ करुन तसेच अशा तहसीलदारांऐवजी तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या गटविकास अधिकारी तसेच इतर तत्सम अधिकारी त्यांच्याकडे ग्रामपंचायत निवडणूक संदर्भातील दिनांक २७ जानेवारी १९९५ च्या आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदारांकडे सोपविलेले अधिकार तत्काळ प्रदान करावेत.