शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘द फ्लाईंग बस’च्या वाहकाचा अखेर मृत्यू; जखमी चालकावर उपचार सुरू

By प्रदीप भाकरे | Updated: December 8, 2022 18:02 IST

एसटी बसचे स्टेअरिंग झाले होते जाम : तीन क्रेनच्या साहाय्याने काढली होती बस

ठळक मुद्देअमरावती-नागपूर महामार्गावरील अपघात

अमरावती : नांदगाव पेठ येथील उड्डाणपूलावर एसटी बसचा अपघात होऊन ती बस उड्डाणपूलाच्या कठड्याला जाऊन धडकली होती. त्यात चालक वाहक गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरेने दाखल करण्यात आले. मात्र त्यातील गंभीर जखमी असलेल्या वाहकाचा रात्रीच उपचारादरम्यान मृत्यू झाला. बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास हा अपघात घडला होता. गजानन वाकपांजर (४१, रा. थिलोरी ता. दर्यापूर) असे मृत वाहकाचे नाव आहे.

नागपूर आगाराची औरंगाबाद नागपूर बस (एम.एच. ४० वाय ५८२८) ही अमरावती बसस्थानकाहून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान नागपूर जायला निघाली. ही बस सात वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ उड्डाणपूलावर पोहचताच ती कठड्यावर जाऊन धडकली. यात गजानन वाकपांजर हे बसमधून खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर बस चालक केशव धोटे हे सुद्धा जखमी आहेत. ३२ प्रवासी घेऊन जाणारी ही एसटी बस अपघातानंतर उड्डाणपूलावर लटकली होती.

एसटी बस अपघातानंतर उड्डाणपूलावर लटकली

एसटी चालकाविरुद्ध गुन्हा

दरम्यान, एमएच ४० वाय ५८२८ या बसने मागून आपल्या मालवाहू वाहनाला धडक दिली. यात आपल्या वाहनाचे नुकसान झाले. तर बस चालकाने त्याची बस उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढविली. पुढे ती कठड्याला अधांतरी लटकली. यात आपल्याला मार लागल्याची तक्रार रोशन पवार (२८, रा. केकतपूर) यांनी नोंदविली. तक्रारीनुसार, नांदगाव पेठ पोलिसांनी एसटी बसचालक केशव धोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmravatiअमरावती