तीन शिक्षकांची प्रकृती गंभीर

By Admin | Updated: June 3, 2016 00:13 IST2016-06-03T00:13:30+5:302016-06-03T00:13:30+5:30

महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने शिक्षकांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी येथील शिक्षण उपसंचालक

The condition of three teachers is serious | तीन शिक्षकांची प्रकृती गंभीर

तीन शिक्षकांची प्रकृती गंभीर

आंदोलनाचा दुसरा दिवस : कायम विनाअनुदानित शिक्षकांची हेळसांड
अमरावती : महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने शिक्षकांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात बुधवारपासून सुरू केलेल्या बेमुदत उपोषणात तीन शिक्षकांची प्रकृती गंभीर झाली आहे. गुरूवारी चार शिक्षकांना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
विनोद इंगळे (अकोला), प्रवीण खंडारे(अकोला) उमेश इंगोले (अमरावती) अशी या शिक्षकांची नावे आहेत. गुरुवारी उपोषण मंडपस्थळी शिक्षक आघाडी महिला जिल्हाध्यक्ष नीता गहरवाल, दलितमित्र मधुकर अभ्यंकर, विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीचे कार्याध्यक्ष दीपक धोटे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नाशिकराव भगत आदींनी भेटी दिल्यात. बुधवारपासून सुरू झालेल्या बेमुदत उपोषणात पहिल्या दिवशी ४३ शिक्षकांचा समावेश झाला आहे.

शासन धोरणावर ताशेरे
अमरावती : गुरुवारी विष्णू मानकर, नितीन बोरखडे हे शिक्षक उपोषणाला बसले. दरम्यान शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्ष संगीता शिंदे आदींनी शिक्षकांचे मनोबल वाढविताना शासन धोरणावर ताशेरे ओढले.
विभागातून यवतमाळ, वाशिम, यवतमाळ, अकोला व अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांनी बेमुदत उपोषणाला जोरदार पाठिंबा दर्शवून एकजुटीचे दर्शन घडविले. आंदोलनात शिक्षण संघर्ष समितीचे विकास दवे, शरद तिरमारे, प्रवीण गुल्हाने, ललित चौधरी, निलय बोंडे, प्रदीप नानोटे आदी उपस्थित होते.
आंदोलनाचे मार्गदर्शन व उपोषणकर्त्यांची देखरेख कृती समितीचे पुंडलिक रहाटे, एस. के. वाहुरवाघ, सुरेश सिरसाट, दीपक देशमुख, आ.जी. पठाण, गोपाल चव्हाण आदी करीत आहेत.

Web Title: The condition of three teachers is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.