जवखेड्यातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ धरणे
By Admin | Updated: November 8, 2014 00:41 IST2014-11-08T00:41:53+5:302014-11-08T00:41:53+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा येथील अनुसूचित जातीच्या तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली.

जवखेड्यातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ धरणे
अमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा येथील अनुसूचित जातीच्या तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला बराच कालावधी लोटला असताना आतापर्यंत आरोपींना अटक झाली नाही. त्यामुळे आरोपींच्या अटकेसह राज्यभरातील दलित कुटुंबाच्या संरक्षणासाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाकडे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी धरणे देण्यात आले. दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा कडाडून निषेध नोंदवित आरोपींना अटक करण्याची मागणी केली .आरोपींवर अटक करण्यात हयगय करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.