शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीविनाच फोडले काँक्रीट रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:14 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंमलात आणलेल्या अमृत योजनेचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या एजन्सीमार्फत कामे करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा प्रताप : महापालिका गप्प का? लक्षावधी रुपयांचा चुराडा

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अंमलात आणलेल्या अमृत योजनेचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या एजन्सीमार्फत कामे करण्यात येत आहेत. मात्र, राधानगर, विनायकनगर परिसरात ही कामे करताना काही दिवसांपूर्वीच बांधलेल्या काँक्रीट रस्ते महापालिकेची कुठलीही परवानगी न घेताच ब्रेकिंग मशीनच्या साहाय्याने फोडण्यात येत आहेत. हा प्रकार रस्त्याचे काम करतानाच होऊ शकला असता; मात्र समन्वयाचा अभाव कायमचा आहे. याबाबत कंत्राटदारासह संबंधित अधिकाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नवीन पाइप लाइन टाकण्याची कामे करण्यात येत आहेत. राधानगर, विनायकनगर हा परिसर मजीप्रा व्हीएमव्ही कार्यालय अंतर्गत उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यकक्षेत येतो.उपायुक्तांना पाठविले पत्रया परिसरात दोन किमीपर्यंत नवीन पाइप लाइनचे काम सुरू आहे. परंतु, त्याच्या काही महिन्यांपूर्वीच राधानगर, गाडगेनगर व विनायकनगर परिसरात महापालिकेने काँक्रीट रस्ते केले. कडेला पेव्हरदेखील बसविले. या कामांवर सहा कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च झाल्याची माहिती आहे. सदर रस्ते व पेव्हर पूर्ववत करून द्यावेत, असा करार महापालिकने मजीप्राशी केलेला आहे. पण, त्यामध्ये रस्त्याच्या एका बाजूने पेव्हर काढून खोदकाम करावे, असे नमूद असल्याचे शहर अभियंता जीवन सदार यांनी सांगितले आहे. काँक्रीट रस्ते फोडण्याबाबत कुठलीही परवानगी दिली नाही. नेमके हेच होत आहे. दुसरीकडे रस्ता फोेडण्यासाठी मजीप्राने महापालिकेच्या उत्तर झोन क्रमांक १ च्या उपायुक्तांना पत्र पाठविल्याचे शाखा अभियंत्यांनी सांगितले. पाइप लाइन टाकण्यासाठी काँक्रीट रस्ते फोडायचे असतील, तर मनपाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. त्या कारणाने परवानगी न घेता काँक्रीट रस्ता फोडलाच कसा, असा प्रश्न विचारला जात आहे. जर हा प्रकार नियमबाह्य असेल, तर मजीप्राचे अभियंता व सदर कंत्राटदारावर कारवाईचा बडगा का उगारू नये, असा प्रश्न विचारला जात आहे.कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांचे काय?नवीन पाइप लाइन टाकण्यासाठी राधानगर, विनायकनगर परिसरातील काँक्रीट रस्ते फोडण्यात येत आहेत. पेव्हरदेखील काढले जात आहेत. काही महिन्यांपूर्वीच महापालिकेने या भागात काँक्रीट रस्त्याची कोट्यवधी रुपयांची कामे केली. हे रस्ते करतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वा मनपाने या परिसरात नियोजित पाइप लाइनचे कुठलेही काम काढले नाही. मात्र, रस्ता पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते फोडण्यात आले आहेत. ते बुजविण्यात आले तरी मजबुतींवर प्रश्नचिन्ह कायमचा लागला आहे. महापालिकेने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचा व जनतेच्या पैशांचा चुरडा करण्याचा अधिकार दिला कुणी, हा प्रश्नही पुढे येत आहे.जनरेटरने ध्वनिप्रदूषणकाँक्रीट रस्ता फोडण्यासाठी वापरण्यात येणाºया ब्रेकिंग मशीन व त्यासाठी लागणाºया ट्रॅक्टरवरील जनरेटरचा कर्कश्श आवाज ध्वनिप्रदूषण करीत आहे. दोनशे ते चारशे फुटांपर्यंत हा आवाज सहनदेखील होत नाही. नागरिक या आवाजाने त्रस्त असून, कमी आवाजाचे जनरेटर व मशीनचा वापर करा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.नाशिकच्या कंत्राटदाराला कामनाशिक येथील एका कंत्राटदाराला शहरात अमृत योजनेंतर्गत ११४ कोटींची कामे करण्यात येत आहे. कामे नियमबाह्य पद्धतीने होत असून, विलंब केला जात असल्याने यामध्ये कारवाईचा बडगा उगारावा, अशीदेखील मागणी होत आहे.महापालिकेचा कुठलाही रस्ता फोडला तरी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला तो तातडीने पूर्ववत करून द्यावा लागणार आहे. याबाबत तसे अ‍ॅग्रिमेंट झाले आहे. कामात दिरंगाई होत असल्याने आतापर्यंत मजीप्राला आठ ते दहा पत्र दिले आहेत.- जीवन सदार, अतिरिक्त शहर अभियंता, महापालिकाकाही कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ब्रेकिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. याकरिता मनपाच्या उपायुक्तांना पत्र देण्यात आले आहे. कमी आवाजाचे जनरेटर वापरण्यासाठी कंत्राटदाराला सांगण्यात येईल.- सिद्धार्थ शेंडेशाखा अभियंता, मजीप्रा