जलवाहिनीसाठी काँक्रीट रस्ते फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:29 IST2018-04-27T01:29:03+5:302018-04-27T01:29:03+5:30
शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाइपलाईन टाकण्यासाठी काँक्रीटचे रस्ते फोडण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराद्वारा ब्रेकींग मशीनचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी ट्रॅक्टरवरील जनरेटरच्या मोठ्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहे.

जलवाहिनीसाठी काँक्रीट रस्ते फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाइपलाईन टाकण्यासाठी काँक्रीटचे रस्ते फोडण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराद्वारा ब्रेकींग मशीनचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी ट्रॅक्टरवरील जनरेटरच्या मोठ्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहे. हे काम बुधवारी येथील गाडगेनगरातील खोडके गल्लीत करण्यात आले.
सद्यस्थितीत विद्यापीठांतर्गत परीक्षा सुरू आहेत. मात्र दिवसभर कर्कश आवाज राहात असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. अमृत योजनेसाठी नाशिकच्या कंत्राटदाराची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे सुरुवातीपासून मंदगतीने होत आहेत. यात आता कर्कश आवाजाची भर पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. जनरेटरच्या धुरामुळे प्रदूषणही वाढले आहे. संबंधित यंत्रणांचे या कामांकडे दुर्लक्ष असल्याने कंत्राटदाराचे फावल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यांना त्रास होऊ नये या पद्धतीने कामाचे नियोजन करून याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कर्कश आवाज होत असेल व विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील तर काही दिवस पुन्हा काम थांबविता येईल. कमी आवाजाचे जनरेटर वापरता येते का? या संदर्भात सुद्धा सूचना करण्यात येईल.
- सुरेश चारथड, मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण