किसान संदेश पदयात्रेचा समारोप

By Admin | Updated: October 7, 2015 01:31 IST2015-10-07T01:31:20+5:302015-10-07T01:31:20+5:30

शेतकऱ्यांना हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकार अच्छे दिन येणार, अशी जाहिरातबाजी करीत आहे.

The conclusion of the message of farmers' message | किसान संदेश पदयात्रेचा समारोप

किसान संदेश पदयात्रेचा समारोप


वरूड : शेतकऱ्यांना हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकार अच्छे दिन येणार, अशी जाहिरातबाजी करीत आहे. परंतु विदर्भातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. नापिकीमुळे सोयाबीन बुडाले असून सावकारी कर्ज त्याच्या डोक्यावर कायम आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुरांना हलाखीचे जीवन जगण्याची वेळ येत आहे. व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार असल्याचे वक्तव्य अखिल भारतीय काँंग्रेसचे सचिव हरिकृष्णजी यांनी केले. किसान संदेश पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
पदयात्रेत अखिल भारतिय कॉग्रेसचे सचिव भय्या पवार , महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस सचिव सागर देशमुख, प्रकाश साबळे, अंदाज वाघमारे, अमरावती लोकसभा युवक काँग्रेस महासचिव सागर यादव, श्रवण लकडे, नरेशचंद्र ठाकरे, तालुकाध्यक्ष अजय नागमोते, सुजित पाटील, जि.प.बांधकाम सभापती गिरीश कराळे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, खविसं अध्यक्ष बाबाराव बोहरुपी, जिल्हा संघटक काँग्रेस प्रदीप कांबळे, जि.प. सदस्य विक्रम ठाकरे, अनिल गुल्हाणे फुलोर घोरमाडे, चंदू अळसपुरे, राजू मालपे, नरेंद्र पावडेसह आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसेचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनात भारतभर २४ मतदारसंघ आणि एक हजार ७०० किमी अंतराची किसान संदेश पदयात्रा सुरु झाली. वरुड तालुक्यात करंजगाव (गांधीघर) ते वरुड १५ किमी पदयात्रा काढण्यात आली.

Web Title: The conclusion of the message of farmers' message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.