प्रहारच्या मध्यस्थीने मांडवगणेंच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST2021-04-03T04:11:46+5:302021-04-03T04:11:46+5:30
धामणगाव रेल्वे : एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सातत्याने होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे रूपराव मांडवगणे यांच्या शेतातील संत्रा पिकांचे मोठे नुकसान ...

प्रहारच्या मध्यस्थीने मांडवगणेंच्या उपोषणाची सांगता
धामणगाव रेल्वे : एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सातत्याने होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे रूपराव मांडवगणे यांच्या शेतातील संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शासनाकडे वारंवार तक्रारी करूनदेखील प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर रूपराव मांडवगणे यांनी १५ मार्चपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. गुरुवारी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्रव्यवहाराने आणि प्रहार कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता झाली.
ना. बच्चू कडु यांनी उपविभागीय अधिकारी यांना समिती गठित करून त्यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या समितीकडून मोका पाहणी करण्यात आली. त्यानंतर समितीने संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कामकाजामुळे रूपराव मांडवगणे यांच्या शेतातील १६ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल दिला. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांकडून मिळाल्यानंतर अखेर १६ दिवसानंतर रूपराव मांडवगणे यांनी उपोषण सोडले. प्रहारचे पदाधिकारी मंगेश देशमुख, जिल्हाप्रमुख प्रवीण हेंडवे, तहसीलदार गौरव भळगाठिया तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आश्वासन देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी शेख दिलावर, गजू डाफ, ऋग्वेद काळे, प्रदीप काळे, सुमीत वानखडे, अक्षय धोपटे, बिरजू हिवसे, प्रशांत हुडे, प्रवीण रोहणकर, विशाल सावरकर, रवि भोकरे यावेळी उपस्थित होते.
-----------------------